स्वीटी सातारकरचे रोज 400 मेसेज, वैवाहिक आयुष्य डिस्टर्ब, मराठी अभिनेत्याची तक्रार

स्वीटी सातारकर नावाची तरुणी दिवसभरात वेगवेगळ्या नंबरवरुन तीनशे ते चारशे मेसेज करत असल्याने हैराण झाल्याचं संग्रामने म्हटलं आहे.

स्वीटी सातारकरचे रोज 400 मेसेज, वैवाहिक आयुष्य डिस्टर्ब, मराठी अभिनेत्याची तक्रार

मुंबई : चाहत्यांचं प्रेम मिळवण्यासाठी कलाकार नेहमीच झटत असतात, मात्र एका चाहतीच्या प्रेमाचा अतिरेक मराठमोळा अभिनेता संग्राम समेळ याला तापदायक ठरत आहे. ‘स्वीटी सातारकर’ नावाची तरुणी दररोज तीनशे ते चारशे मेसेज करुन आपल्याला त्रास देत असल्याची तक्रार संग्रामने फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून (Actor Sangram Samel Fan Torture) केली आहे.

संग्रामने फेसबुकवर लाईव्ह येऊन आपल्या झालेला मनस्ताप व्यक्त केला आहे. स्वीटी सातारकर नावाची तरुणी दिवसभरात वेगवेगळ्या नंबरवरुन तीनशे ते चारशे मेसेज करत असल्याने हैराण झाल्याचं संग्रामने म्हटलं आहे. त्यामुळे माझ्या कौटुंबिक आणि वैवाहिक आयुष्यात अडचणी येत असल्याने ही पोस्ट करण्याची वेळ आल्याचं त्याने सांगितलं.

‘कृपया तिचे पालक तुमच्या परिचयात असल्यास त्यांच्यापर्यंत हा संदेश पोहोचवा, माझे प्रयत्न संपले, काय करावं कळत नाही, तुम्ही मदत केलीत, तर मी अडचणीतून बाहेर पडेन आणि एका चांगल्या मुलीचंही नुकसान होणार नाही’, अशी विनंतीही संग्रामने केली आहे.

संग्राम अभिनेत्री पल्लवी पाटीलसोबत विवाहबंधनात अडकला आहे. सध्या तो ‘कुसुम मनोहर लेले’ या पुनरुज्जीवित नाटकाचे प्रयोग करतो, तर आनंदी हे जग सारे या मालिकेत तो काम करतो. विक्की वेलिंगकर, उंडगा, ब्रेव्ह हार्ट यासारख्या चित्रपटात, तर ललित 205, बापमाणूस, दिल्या घरी तू सुखी राहा यासारख्या मालिकांतही दिसला होता. ‘संगीत एकच प्याला’ या नाटकातील त्याची भूमिका प्रचंड गाजली होती. (Actor Sangram Samel Fan Torture)

संबंधित बातम्या :

राहुल गांधींविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, अभिनेते योगेश सोमणांवर कारवाईचा इशारा

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *