उद्धव ठाकरेंचं अभिनंदन, आता 5 झाडं घेऊन प्रत्येकाने ‘आरे’त या : सयाजी शिंदे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरे कारशेडला दिलेल्या स्थगितीबद्दल झाडप्रेमी अभिनेते सयाजी शिंदे (Sayaji Shinde Uddhav Thackeray) यांनी अभिनंदन केलं आहे.

उद्धव ठाकरेंचं अभिनंदन, आता 5 झाडं घेऊन प्रत्येकाने ‘आरे’त या : सयाजी शिंदे

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरे कारशेडला दिलेल्या स्थगितीबद्दल झाडप्रेमी अभिनेते सयाजी शिंदे (Sayaji Shinde Uddhav Thackeray) यांनी अभिनंदन केलं आहे. पुढील आदेशापर्यंत आरे कॉलनीतील एक पानही तोडू देणार नाही, असा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Sayaji Shinde Uddhav Thackeray) यांनी घेतला. त्याबद्दल सयाजी शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांचं तोंड भरुन कौतुक केलंच, शिवाय त्यांच्याकडून एक अपेक्षाही व्यक्त केली.

टीव्ही 9 मराठीशी बोलताना सयाजी शिंदे म्हणाले, “आरेमध्ये कारशेड व्हावं किंवा न व्हावं, मेट्रो व्हावी की नाही हा शासनाचा निर्णय आहे. पण विकासाच्या नावाखाली झाडं तोडली जाऊ नयते. उद्धव ठाकरे यांच्या आरे कॉलनीतील एक पानही तोडू देणार नाही, या विधानाचं आम्ही महाराष्ट्रातील झाड लावणाऱ्यांच्यावतीने स्वागत करतो.          आरे कॉलनीत आम्ही दर रविवारी झाडं लावण्यासाठी जातो. ज्यांना ज्यांना या कामात सहभागी व्हायचं आहे, त्यांनी दर रविवारी स्वत:ची 5 झाडं घेऊन आरे कॉलनीत यावं.”

प्लॅस्टिकमुक्त आरे आणि देशी झाडांनीयुक्त आरे करण्यासाठी सयाजी शिंदे यांनी मोहिम हाती घेतली आहे. या मोहिमेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं सहकार्य मिळावं, अशी अपेक्षा व्यक्त केली.

आरे कॉलनी ज्या खात्याअंतर्गत येते त्यांनी आणि महापालिकेने आम्हाला सहकार्य करावं. आरे प्लॅस्टिकमुक्त आणि देशा झाडांनीयुक्त करायचं आहे. त्यासाठी आपल्याला सहकार्य हवं आहे. महाराष्ट्रात देशी झाडं लावायची आहेत, त्याची सुरुवात आरेपासून करु, असं सयाजी शिंदे म्हणाले.

VIDEO :

आरे कारशेडला स्थगिती

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल आपल्या दुसऱ्याच कॅबिनेट बैठकीत मोठा निर्णय घेतला. मुंबईतील प्रस्तावित मेट्रो कारशेडला स्थगिती (Aarey car shed work suspended by CM Uddhav Thackeray ) देण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांनी कॅबिनेट बैठकीनंतर पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली.

“आरेला स्थगिती दिली आहे. जोपर्यंत याचा आढावा घेतला जात नाही तोपर्यंत हे काम सुरु राहणार नाही”, अशी मोठी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Aarey car shed work suspended by CM Uddhav Thackeray ) यांनी केली.

संबंधित बातम्या 

आरे कारशेडला स्थगिती, एक पानही तोडणार नाही, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मोठा निर्णय

आरे कारशेडला स्थगिती, एक पानही तोडणार नाही : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *