अभिनेता सनी देओलचा भाजपात प्रवेश

नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेता सनी देओलने भारतीय जनता पक्षात आज (23 एप्रिल) प्रवेश केला. नवी दिल्ली येथील भाजप कार्यालयात सनी देओलचा पक्षप्रवेश पार पडला. यावेळी केंद्रीय संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण, अर्थमंत्री पियुष गोयल आणि भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते. देशात लोकसभा निवडणुका सुरु आहेत. या निवडणुकांच्या दरम्यान अनेक बॉलिवूड कलाकारांनी राजकारणात एण्ट्री केली आहे. नुकतेच […]

अभिनेता सनी देओलचा भाजपात प्रवेश
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:00 PM

नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेता सनी देओलने भारतीय जनता पक्षात आज (23 एप्रिल) प्रवेश केला. नवी दिल्ली येथील भाजप कार्यालयात सनी देओलचा पक्षप्रवेश पार पडला. यावेळी केंद्रीय संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण, अर्थमंत्री पियुष गोयल आणि भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.

देशात लोकसभा निवडणुका सुरु आहेत. या निवडणुकांच्या दरम्यान अनेक बॉलिवूड कलाकारांनी राजकारणात एण्ट्री केली आहे. नुकतेच बॉलिवूडमधील अभिनेत्री उर्मिला मातोंडकरनेही काँग्रेसमध्ये प्रवेश घेत, मुंबईतून निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे. आता भाजपमध्ये सनी देओलने प्रवेश केला आहे. सनी देओल आता कोणत्या मतदारसंघातून उभे राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

गेले अनेक दिवसांपासून सनी देओल भाजपात प्रवेश करणार यावर जोरदार चर्चा सुरु होती. सनी देओल आणि अमित शाह या दोघांचा एकत्र असलेला फोटो व्हायरल झाल्यामुळे सनी देओलच्या चर्चेला उधाण आलं होते. यावर सनीनेही मी भाजपमध्ये प्रवेश करणार नसल्याचे स्पष्टीकरण दिले होते. मात्र आज भाजपच्या दिल्ली येथील कार्यालयात सनी देओल याने भाजपात अधिकृतपणे प्रवेश केला आहे.

सनी देओलची सावत्र आई ज्येष्ठ अभिनेत्री हेमा मालिनीही भाजपच्या उत्तर प्रदेशातील मथुरेतून खासदार आहेत. मथुरा मतदारसंघातून हेमा मालिनी यंदाही निवडणूक रिंगणात आहे.

“माझे वडील अनेक वर्ष भाजपच्या परिवारासोबत आहेत. वडील अटल बिहारी वाजपेयींसोबत होते, मी आता मोदींसोबत काम करणार आहे. मोदी पुढील पाच वर्षासाठी भारतात पंतप्रधान म्हणून असावे, त्यामुळे आपला देश आणखी पुढे जाईल. मी जास्त बोलणार नाही पण काम करुन दाखवून देईल”, असे सनी देओल म्हणाला.

Non Stop LIVE Update
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.