ऐश्वर्या करणार कटप्पासोबत रोमान्स

मुंबई : बाहुबली’ या चित्रपटाने बॉक्स ऑफीसवर बरेच विक्रम रचले. या चित्रपटातील प्रत्येक भूमिकेने प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली. सत्यराज यांनी साकारलेली कटप्पाची भूमिका संपूर्ण देशात इतकी लोकप्रिय झाली की, त्यांना कटप्पा म्हणूनच ओळखू लागले. सत्यराज हे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील नावाजलेले व्यक्तिमत्त्व आहे. आता बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि सत्यराज एकाच चित्रपटात दिसणार आहेत. ऐश्वर्या कटप्पासोबत …

ऐश्वर्या करणार कटप्पासोबत रोमान्स

मुंबई : बाहुबली’ या चित्रपटाने बॉक्स ऑफीसवर बरेच विक्रम रचले. या चित्रपटातील प्रत्येक भूमिकेने प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली. सत्यराज यांनी साकारलेली कटप्पाची भूमिका संपूर्ण देशात इतकी लोकप्रिय झाली की, त्यांना कटप्पा म्हणूनच ओळखू लागले. सत्यराज हे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील नावाजलेले व्यक्तिमत्त्व आहे. आता बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि सत्यराज एकाच चित्रपटात दिसणार आहेत. ऐश्वर्या कटप्पासोबत ऑनस्क्रीन रोमान्सही करताना दिसणार आहे.

मणिरत्नम यांच्या ‘पोन्निनी सेल्वम’ या आगामी चित्रपटात सत्यराज महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहे. या चित्रपटात ऐश्वर्या मुख्य भूमिकेत आहे. तर ऐश्वर्याच्या पतीची भूमिका सत्यराज साकारणार असल्याचं म्हटलं जात आहे. यामध्ये ऐश्वर्या एका राजकुमारीच्या भूमिकेत झळकणार आहे. एका तामिळ कादंबरीवर या चित्रपटाची कथा आहे.

विशेष म्हणजे या चित्रपटातील एका भूमिकेसाठी मणिरत्नम यांनी अमिताभ बच्चन यांनासुद्धा विचारलं आहे. पण अद्याप त्यांनी या भूमिकेसाठी होकार दिलेला नाही. या चित्रपटात ऐश्वर्याच्या पतीच्या भूमिकेसाठी आधी मोहनबाबू यांना विचारण्यात आलं होतं. मात्र त्याऐवजी आता सत्यराज यांची निवड करण्यात आली आहे.

ऐश्वर्या याआधी 2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘फन्ने खाँ’ या बॉलिवूड चित्रपटात झळकली होती. पण हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अयशस्वी ठरला. आता दाक्षिणात्य चित्रपटात ऐश्वर्याची जादू चालणार का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *