प्रज्ञा ठाकूरच्या वक्तव्यावरुन स्वरा भास्कर-पायल रोहतगी ट्विटरवर भिडल्या!

मुंबई : भाजपची भोपाळ लोकसभा मतदारसंघातील उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर हिने शहीद हेमंत करकरे यांचा अपमान केल्यामुळे देशात संतापाची लाट उसळली आहे. प्रज्ञाच्या या वक्तव्यामुळे सर्वच स्तरातून तिच्यावर टीका केली जात आहे. या मुद्द्यावर बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करनेही सोशल मीडियावर भाजप आणि प्रज्ञावर निशाणा साधला. मात्र याला अभिनेत्री पायल रोहतगीने स्वराच्या विरोधात उत्तर दिले आहे. […]

प्रज्ञा ठाकूरच्या वक्तव्यावरुन स्वरा भास्कर-पायल रोहतगी ट्विटरवर भिडल्या!
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:00 PM

मुंबई : भाजपची भोपाळ लोकसभा मतदारसंघातील उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर हिने शहीद हेमंत करकरे यांचा अपमान केल्यामुळे देशात संतापाची लाट उसळली आहे. प्रज्ञाच्या या वक्तव्यामुळे सर्वच स्तरातून तिच्यावर टीका केली जात आहे. या मुद्द्यावर बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करनेही सोशल मीडियावर भाजप आणि प्रज्ञावर निशाणा साधला. मात्र याला अभिनेत्री पायल रोहतगीने स्वराच्या विरोधात उत्तर दिले आहे. त्यामुळे सोशल मीडियावरच प्रज्ञा ठाकूरच्या मुद्दयावरुन या दोन अभिनेत्री एकमेकांना भिडल्या.

स्वरा भास्करने ट्वीटमध्ये म्हटले आहे की, “ही खूप लाजीरवाणी गोष्ट आहे. आपण सर्व लोक पाहत आहे, भाजपवाले दहशतवादी आरोपीच्या मागे उभं राहून टाळ्या वाजवत आहेत. ज्यांनी देश सेवा करताना आपले प्राण गमावले अशा व्यक्तीबद्दल प्रज्ञा खोटं बोलत आहे आणि त्यांचा अपमान करत आहे.”

स्वरा भास्करने भाजपवर निशाणा साधल्यामुळे पायल रोहतगीला रुचलं नाही. कारण अनेकदा पायलने भाजपला समर्थन केलं आहे. तसेच तिने अनेक भाजपचे व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. ज्यामध्ये ती भाजपविरोधात बोलणाऱ्यावर नेहमी टीका करताना दिसते. तसेच यावेळी तिने स्वरावरही निशाणा साधला.

स्वराच्या ट्वीटला रिट्वीट करत पायलने लिहिलं, “मी माधुरी दिक्षीत, वरुण धवन, आलिया भट्ट, करण जोहरला कलंक चित्रपटात दहशतवादी आरोपी आणि शिक्षा भोगून आलेल्या संजय दत्तसोबत काम करताना पाहिलं. आपण राजकुमार हिरानीचा संजय दत्तच्या जीवनावर आधारीत चित्रपटही पाहिला असेल. ज्यामध्ये रणबीर कपूरने संजय दत्तची भूमिका साकारली आहे. बॉलिवूडमधील या लोकांसाठी तुमच्याकडे काही शब्द आहेत का?, तू कशावरुन बोलते की, साध्वी खोटं बोलत आहे?”

पायलने स्वराच्या पोस्टवर दिलेल्या उत्तरामुळे आता स्वरा काय उत्तर देते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र प्रज्ञा ठाकूरचे समर्थन केल्यामुळे आता पायल रोहतगीला अनेकांच्या टीकेला सामोरे जावे लागत आहे.

 प्रज्ञा ठाकूरचे वादग्रस्त विधान

“हेमंत करकरेंनी मला चुकीच्या पद्धतीने मालेगाव बॉम्बस्फोटाच्या खटल्यात अडकवलं. त्यामुळे त्यांना त्यांच्या कर्माचं फळ मिळालं,” असं साध्वी म्हणाली होती.

तुझा सर्वनाश होईल, असं मी म्हटलं होतं. त्यांनी मला शिव्या दिल्या होत्या. ज्यावेळी मी गेले तेव्हापासून सूतक लागलं होतं, पण दहशतवाद्यांना त्यांना मारलं तेव्हा माझं सूतक संपलं, असं संतापजनक विधान साध्वी प्रज्ञाने केलं होते.

 

Non Stop LIVE Update
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार.
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.