पतीकडून दारु पिऊन बाथरुममध्ये मारहाण, अभिनेत्रीची तक्रार

पतीकडून दारु पिऊन बाथरुममध्ये मारहाण, अभिनेत्रीची तक्रार

मुंबई: टीव्ही अभिनेत्री आरजू गोवित्रीकरvs (Arzoo Govitrikar) पतीविरोधात वरळी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. पती सिद्धार्थ सब्बरवालने छळ केल्याचा आरोप करत आरजूने पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे. मारहाणीचा पुरावा म्हणून आरजूने सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना सादर केले असून, त्यात पती सिद्धार्थ सब्बरवाल आरजूला मारहाण करताना आणि तिच्याशी हुज्जत घालताना दिसतोय. 15 फेब्रुवारीला पती-पत्नीमध्ये वाद झाला. त्यानंतर पहाटे चारच्या सुमारास नवऱ्याने बाथरूममध्ये फरफटत नेलं आणि तिला मारहाण करण्यात आल्याचं तिने आपल्या तक्रारीत म्हटलं आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून सिद्धार्थ सब्बरवाल दारुच्या नशेत मारहाण करतो, असंही तिने तक्रारीत नमूद केलं आहे.

आरजू ही मॉडेल -अभिनेत्री आदिती गोवित्रीकरची बहीण आहे. सिद्धार्थ आणि आरजूचा 2010 मध्ये प्रेमविवाह झाला होता. आरजू आणि सिद्धार्थ हे वरळीतील पोचखानवाला रोड परिसरात राहात होती. मात्र नवऱ्याच्या मारहाणीला कंटाळून ती आपल्या माहेरी परत गेली होती.

19 फेब्रुवारीला दाखल केलेल्या तक्रारीत आरजूने म्हटलंय की, “पतीच्या दारुच्या व्यसनावरुन 15 फेब्रुवारीला आमच्यात वाद झाला होता. त्यानंतर पतीने पहाटे 4 च्या सुमारास बाथरुममध्ये फरफटत नेलं आणि तिथे जबर मारहाण केली”

चेहऱ्यावर थुंकण्याचा आरोप
सिद्धार्थ आपल्या कुटुंबाला मारण्याची धमकी देत होता, असाही आरोप आरजूने केला आहे. यापूर्वी 22 जानेवारीला आमच्यात वाद झाला होता, त्यावेळी सिद्धार्थ माझ्या चेहऱ्यावर थुंकला होता, त्यावेळी त्याला विरोध केल्यानंतर तो पुन्हा थुंकला असा आरोप आरजूने केला.

आरजू आणि तिची बहीण आदिती तसंच त्यांचा कॉमन फ्रेंड अभिनेता आशिष चौधरी हे सर्वजण मंगळवारी वरळी पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले होते. सिद्धार्थने त्यांच्या पाच वर्षांच्या मुलाला जबरदस्तीने स्वत:कडे ठेवल्याचा आरोप यावेळी त्यांनी केला.
दरम्यान, पोलिसांनी सिद्धार्थविरोधात 498A (कौटुंबिक हिंसाचार), 323 मारहाण, 504, 506 धमकी आणि 509 यासारख्या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

पती सिद्धार्थचं स्पष्टीकरण
याप्रकरणी सिद्धार्थने सर्व आरोप फेटाळले आहेत. एका क्राईम शोच्या सरावासाठी आम्ही मारहाणीचं नाटक करत होतो, असं सिद्धार्थने सीसीटीव्ही फुजेटबाबत सांगितलं. सर्व आरोपांचं उत्तर देण्यास आपण तयार असल्याचंही त्याने म्हटलं आहे.

कोण आहे आरजू गोवित्रीकर?

आरजू गोवित्रीकर ही टीव्ही अभिनेत्री आहे.

आरजू गोवित्रीकरने विविध हिंदी सिनेमातही काम केलं आहे.

आरजूने बागबान (2003), ड्रीम्स डू कम ट्रू (2009), मेरे बाप पेहले आप (2008) या सिनेमांमध्ये भूमिका साकरली आहे.

अभिनेत्री आरती गोवित्रीकरची ती बहीण आहे. आरती यांनी अनेक हिंदी सिनेमात काम केलं आहे. रिंगा रिंगा या मराठी सिनेमातही त्या दिसल्या होत्या.
VIDEO:

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *