Malvi Malhotra | आधी चाकूहल्ला, आता जीवे मारण्याच्या धमक्या, अभिनेत्रीची मदतीसाठी पोलिसांना साद

मालवीने ट्विट करत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, गृहमंत्री, मुंबई पोलिसांकडे मदत मागितली आहे.

Malvi Malhotra | आधी चाकूहल्ला, आता जीवे मारण्याच्या धमक्या, अभिनेत्रीची मदतीसाठी पोलिसांना साद

मुंबई : लग्नास नकार दिल्याने मुंबईत चित्रपट अभिनेत्री मालवी मल्होत्रा (Malvi Malhotra) हिच्यावर तिच्या मित्राकडून चाकूहल्ला झाला होता. या हल्ल्यात मालवी जबर जखमी झाली होती. यानंतर मालवीवर कोकिलाबेन धीरुबाई अंबानी रुग्णालयात उपचार सुरु होते. या हल्ल्यानंतर तिच्यावर प्लास्टिक सर्जरी देखील करावी लागली होती. या सगळ्याप्रकारातून सावरत असतानाच मालवीवर आणखी एक संकट कोसळले आहे. मालवीला आता जीवे मारण्याच्या धमक्या (Death Threats) मिळत आहेत. तिने मदतीसाठी मुंबई पोलिसांकडे आर्जव केला आहे (Actress Malvi Malhotra receives death threats after attack).

मालवीने ट्विट करत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, गृहमंत्री, मुंबई पोलिसांकडे मदत मागितली आहे. तिने ट्विट करत म्हटले की, ‘योगेश महिपालने माझ्यावर हल्ला केल्यानंतर आता मला जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. कोणी तरी अज्ञात व्यक्ती यासंदर्भात मला धमकी देत आहे. मला आणि माझ्या कुटुंबाला याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असे बोलले जात आहे.’

(Actress Malvi Malhotra receives death threats after attack)

मी खूप घाबरलेय…

मालवी पुढे म्हणते, ‘या हल्ल्यानंतर मी शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या खूप घाबरले आहे. यातून सावरत होतेच की आता जीवे मारण्याच्या धमक्या मिळू लागल्या आहेत. अजूनही योगेशचा चेहरा आठवला की मला खूप भीती वाटते.’

मात्र, मुंबई पोलिसांनी वेळीच योगेशला अटक केली होती. यामुळे माझा जीव वाचला असे म्हणत, तिने मुंबई पोलिसांचे आभार मानले आहे (Actress Malvi Malhotra receives death threats after attack).

मित्राकडून मालवीवर हल्ला

29 वर्षीय मालवीने अनेक हिंदी चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्ये भूमिका केल्या आहेत. मालवीवर एकतर्फी प्रेम करणाऱ्या योगेशकुमार महिपाल सिंग या आरोपीने तिला लग्नाची मागणी घातली होती. मात्र मालवीने ती धुडकावल्याच्या रागातून त्याने तिच्यावर चाकू हल्ला केला.

हल्लेखोर आरोपीने फेसबुकवरुन मालवीशी संपर्क साधला होता. याआधी तीन-चार वेळा तो मालवीला भेटला होता. आपण निर्माता असल्याचे सांगून त्याने मालवीची भेट घेतली होती. त्यानंतर त्याने लग्नासाठी तिला प्रपोज केले होते. तो मालवीवर लग्न करण्यासाठी दबाव टाकत होता. मात्र तिचा ठाम नकार होता. ती दुर्लक्ष करत असल्याने योगेश तिचा पाठलाग करत असे.

मालवीच्या नकारामुळे संतापलेला आरोपी तिच्यावर पाळत ठेवून होता. मालवी दुबईहून परतल्यावर आरोपी अंधेरीतील वर्सोवा भागात तो ऑडीने आला आणि तिच्यावर चाकूने हल्ला केला. मालवीच्या पोटात, मनगटावर आणि बोटावर अशा तीन ठिकाणी वार केले होते.

(Actress Malvi Malhotra receives death threats after attack)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *