'चांदीच्या ताटात फणसाचे गरे', नेहा पेंडसेचा अनोखा उखाणा

मराठी आणि हिंदीमधील सुप्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री नेहा पेंडसे विवाह बंधनात अडकली आहे. शार्दुल सिंग बयाससोबत तिने 5 जानेवारीला लग्न केलं.

'चांदीच्या ताटात फणसाचे गरे', नेहा पेंडसेचा अनोखा उखाणा

मुंबई : मराठी आणि हिंदीमधील सुप्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री नेहा पेंडसे विवाह बंधनात अडकली आहे (Nehha Pendse wedding). शार्दुल सिंग बयाससोबत तिने 5 जानेवारीला लग्न केलं. त्यांचं लग्न पुण्यात मराठी पंरंपरेनुसार झालं. यावेळी नेहा मराठमोळी नवरी म्हणून शोभत होती. ती अत्यंत सुंदर दिसत होती. नेहा आणि शार्दुलच्या लग्नाचे काही फोटो आणि व्हिडीओ सध्या समोर आले आहेत. यामध्ये नेहाचा उखाणा घेतानाचा व्हिडीओ अगदी खास आहे (Nehha Pendse wedding).

मराठी लग्न परंपरेनुसार झालेल्या या लग्नात नेहालाही उखाणा घ्यायला सांगितलं. तेव्हा तिने अगदी अनोख्या पद्धतीने उखाणा घेतला. तिचा उखाणा ऐकून उपस्थित सर्वच हसू लागले.

आता तुम्हीच ऐका नेहाने घेतलेला उखाणा –

 

View this post on Instagram

 

नवरीचा उखाणा #yaarkishadi #shardulnehha #pune #maharastrianwedding

A post shared by Abhijeet Khandkekar (@abhijeetkhandkekar) on

‘चांदीच्या ताटात फणसाचे गरे, शार्दुलराव आहेत तसे बरे… वागतील तेव्हा खरे…’, असा उखाणा नेहाने घेतला.

नेहाने लग्नात मराठमोळा लूक केला होता. ती तिच्या लग्नात नववारी घालेल हे तिने आधीच सांगितलं होतं. मात्र, त्यामध्ये तिला कुठलेही भडक रंग नकोत असंही तिने स्पष्ट केलं होतं. त्याप्रमाणे तिने लग्नात फिक्या गुलाबी रंगाची नववारी नेसली होती. त्यासोबत तिथे नथ, कपाळावर चंद्रकोर, हिरवा चुडा आणि केसांमध्ये गजरा घातला होता. तर शार्दुलने फिक्या गुलाबी-पांढऱ्या कॉम्बिनेशनचा कुर्ता घातला होता.

लग्नापूर्वी नेहा आणि शार्दुलचा साखरपुडा पार पडला. यावेळी तिने हिरव्या रंगाचा सुंदर गाऊन घातला होता. तर शार्दुलने सूट घातला होता. नेहाच्या संगीतचेही फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत. यामध्ये तिने फंकी अशी मल्टीकलर लेहंगा-चोली घातली आहे. नेहा आणि शार्दुलचं लग्न पुण्यात पार पडलं. यावेळी त्यांचे कुटुंबिय आणि जवळचे मित्र लग्न सोहळ्यात सहभागी झाले होते.

Nehha Pendse wedding special ukhana

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *