'फेमिना मिस इंडिया' अदिती आर्या कबीर खानच्या बहुप्रतीक्षित चित्रपटात झळकणार

अदिती आर्या ही दिग्दर्शक कबीर खान यांच्या ‘83’ या सिनेमातून ती बॉलिवूडमध्ये पदार्पण (Aditi Arya Bollywood entry) करत आहे.

Aditi Arya Bollywood entry, ‘फेमिना मिस इंडिया’ अदिती आर्या कबीर खानच्या बहुप्रतीक्षित चित्रपटात झळकणार

मुंबई : 2015 ची फेमिना मिस इंडिया आणि मिस वर्ल्ड स्पर्धेत भारताचं प्रतिनिधीत्व केलेली मॉडेल अदिती आर्या (Aditi Arya Bollywood entry) बॉलिवूडमध्ये पदार्पणासाठी सज्ज आहे. दिग्दर्शक कबीर खानच्या ‘83’ या सिनेमातून ती बॉलिवूडमध्ये पदार्पण (Aditi Arya Bollywood entry) करत आहे. टीम इंडियाचे माजी कर्णधार कपिल देव यांच्यावर हा सिनेमा आहे. या सिनेमात अभिनेता रणवीर सिंह कपिल देव यांची भूमिका साकारत आहे.

अदिती आर्या ही दाक्षिणात्य सिनेमात तिच्या मोहक अदा आणि तिच्या अप्रतिम अभिनयासाठी ओळखली जाते. आता ती ‘83’मधून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवत आहे. हा चित्रपट 10 एप्रिल 2020 रोजी प्रदर्शित होणार आहे.

“मला या चित्रपटाचा पहिल्यापासून एक भाग व्हायचं होतं, कारण त्यात भारताला अभिमान वाटणारा ऐतिहासिक क्षण आहे. मी स्वतःला खूप नशीबवान समजते की माझ्या करियरच्या सुरुवातीलाच मला एवढ्या मोठ्या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. कबीर खानसारख्या दिग्दर्शकासोबत काम करणे म्हणजे एक अविस्मरणीय अनुभव आहे”, असं अदिती म्हणाली.

या चित्रपटात रणवीर सिंह, दीपिका पादुकोण, पंकज त्रिपाठी, साकीब सलीम, बोमन इराणी यांच्यासह दिग्गजांची फौज आहे. दिग्दर्शक कबीर खान यांनी चित्रपटाच्या माध्यमातून इतिहासाची पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न केला आहे.

अदितीने दक्षिणेकडील ‘सेव्हन’, ‘आयएसएम’ आणि ‘कुरुक्षेत्र’ सारख्या लोकप्रिय चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे. तिने दक्षिण चित्रपटातच नाहीतर हिंदी वेब सीरिज ‘तंत्र’ आणि  “स्पॉटलाईट” मध्ये सुद्धा काम केले आहे.

संबंधित बातम्या

मंगळसूत्राची वाटी उलटी, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी विवाहबंधनात?

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *