
बॉलीवूडचे ‘ही मॅन’ अभिनेते धर्मेंद्र यांच्या तब्येतीबद्दल चिंता व्यक्त होत असतानाच त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. धर्मेंद्र यांना जुहू इथल्या घरी नेण्यात आलं असून त्यांच्यावरील पुढील उपचार घरीच सुरू राहतील, अशी माहिती समोर येत आहे.
बॉलीवूडवर राज्य केलं
धर्मेंद्र हे नेहमीच त्यांच्या दशकातील एक देखणा हिरो, अभिनेता राहिले आहेत. त्यावेळी त्यांनी बॉलीवूडवर राज्य केलं. त्यांचे इतके जबरदस्त चाहते होते की सामान्य मुलीच नव्हे तर बॉलीवूडच्या सर्वोत्तम अभिनेत्रीही त्यांच्या प्रेमात असायच्या. धर्मेंद्र हे त्यांच्या चित्रपटांपेक्षाही त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे कायम चर्चेत राहिले आहेत.
धर्मेंद्र आणि हेमा मालिनी प्रेमकहाणी
बॉलीवूडमध्ये प्रवेश करण्यापूर्वी, 10 वर्षांच्या धर्मेंद्रने 1957 मध्ये प्रकाश कौरशी लग्न केले. बॉलीवूडमध्ये प्रवेश केल्यानंतर, ते विवाहित असतानाही हेमा मालिनी यांच्या प्रेमात पडले. या दोघांची प्रेमकहाणी सर्वांनाच माहित आहे. असे म्हटले जाते की धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांना पहिल्यांदा “तुम हसीन मैं जवान” चित्रपटाच्या सेटवर पाहिल्यानंतर प्रेमात पडले. अखेर 1980 मध्ये त्यांनी लग्न केले. त्यांच्या प्रेम कहाणीचे किस्से आणि या जोडीबद्दलची चर्चा सर्वत्र होत होती आणि आजही होते. हेमा यांच्याशी लग्न करतानाही त्यांनी अनेक तडजोडी केल्या होत्या.
धर्मेंद्र 27 वर्षांनी लहान अभिनेत्रीच्या प्रेमात पडले
पण ही गोष्ट फार कमी लोकांनी माहित असेल की हेमा यांच्याशी लग्न केल्यानंतरही ते तिसऱ्यांदा एका अभिनेत्रीच्या प्रेमात पडले होते. ही अभिनेत्री 27 वर्षांनी लहान होती. 80 च्या दशकात त्यांची एका अभिनेत्रीशी भेट झाली. जे की इंडस्ट्रीतील एक मोठं नाव होतं. त्यानंतर धर्मेंद्र आणि त्या अभिनेत्रीच्या नावाच्या चर्चाही होऊ लागल्या होत्या. ही अभिनेत्री म्हणजे अनिता राज.
सौंदर्याने मोहित झाले आणि तिच्या प्रेमात पडले
धर्मेंद्र आणि अनिता यांनी “करिश्मा कुदरत का,” “जलजला,” आणि “इन्सानियत के दुश्मन” यासारख्या अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले. त्या काळात धर्मेंद्र अनिताच्या सौंदर्याने मोहित झाले आणि तिच्या प्रेमात पडले असे वृत्त आहे. काही वृत्तांत असे सांगितले जाते की धर्मेंद्र आणि अनिताच्या जवळच्या नात्यामुळे हेमा मालिनी नाराज होत्या.
धर्मेंद्रच्या अनितासोबतच्या नात्यामुळे खूप नाराज
त्यानंतर बॉलिवूडमध्ये अशीही चर्चा होऊ लागली होती की धर्मेंद्रने अनिताची शिफारस अनेक दिग्दर्शकांना करायला सुरुवात केली होती. दरम्यान, धर्मेंद्रच्या अनितासोबतच्या नात्यामुळे हेमा खूप नाराज होत्या. अखेर, हेमा यांनी हस्तक्षेप केला आणि त्यांच्यात वाद व्हायला सुरुवात केली होती. हेमा यांनी धर्मेंद्र यांना अनितापासून दूर राहण्याचा इशारा दिला होता.तसचे त्या एकदा सेटवरही गेल्या होत्या आणि त्यांच्यातही वाद झाले होते.
अनेक टीव्ही शोमध्ये काम केले
चित्रपटांव्यतिरिक्त, तिने टेलिव्हिजन मालिकांमध्येही मोठ्या प्रमाणात काम केले आहे. “एक था राजा एक थी रानी” आणि “छोटी सरदारनी” मधील कुलवंत कौर ढिल्लन यांच्या भूमिकांमुळे तिला घराघरात ओळख मिळाली. अनिताने सुनील हिंगोरानी यांच्या पहिल्या चित्रपट “करिश्मा कुदरत का” मध्ये काम केले तेव्हा ते प्रेमात पडले आणि 1986 मध्ये त्यांनी लग्न केले.