Man vs Wild : रजनीकांतनंतर आता अक्षय, दीपिका आणि विराटही जंगल सफारीवर

'मॅन व्हर्सेस वाईल्ड' (Man vs Wild) शोमधून प्रसिद्ध असलेला बेअर ग्रिल्सचे जगभरात लाखो (Deepika padukone and Virat Kohli) चाहते आहेत.

Man vs Wild : रजनीकांतनंतर आता अक्षय, दीपिका आणि विराटही जंगल सफारीवर

मुंबई : ‘मॅन व्हर्सेस वाईल्ड’ (Man vs Wild) शोमधून प्रसिद्ध असलेला बेअर ग्रिल्सचे जगभरात लाखो (Deepika padukone and Virat Kohli) चाहते आहेत. जगभरातील अनेक मोठे सेलिब्रिटी त्याच्या शोमध्ये सहभागी झाले आहेत. तसेच या शोमध्ये सहभागी होण्यासाठी मोठे सेलिब्रिटीही उत्सुक असतात. पंतप्रधान नरेंद्र मोदींनंतर भारतीय सेलिब्रिटीही या शोमध्ये सहभागी होणार आहे. यामध्ये भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण दिसण्याची शक्यता (Deepika padukone and Virat Kohli) आहे.

नुकतेच दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांतनेही मॅन वर्सेस वाईल्डसाठी आपली शूटिंग पूर्ण केली आहे. या शोमध्ये सहभागी होणारे रजनीकांत चित्रपट सृष्टीतील पहिले सेलिब्रिटी ठरले आहेत. त्यांच्यानंतर आता अभिनेता अक्षय कुमारही या शोमध्ये दिसणार असल्याचे बोललं जात आहे. विशेष म्हणजे या शोच्या शूटिंगसाठीही तो पोहोचला आहे.

विराट आणि दीपिका लवकरच मॅन वर्सेस वाईल्ड शोमध्ये दिसणार आहेत. दोघे लवकरच या शोच्या नव्या सीजनसाठी दुसऱ्या आणि तिसऱ्या भागासाठी शुटिंग करु शकतात, अशी माहिती मिळत आहे.

दरम्यान, बेअर ग्रिल्सच्या या शोसाठी अनेक भारतीय सेलिब्रिटी उत्साहीत आहेत. रजनीकांत, अक्षय, दीपिका आणि विराटनंतर आणखी कोण-कोण या शोमध्ये दिसणार हे भविष्यात कळेल.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *