सोनाली, इरफाननंतर आता 'या' अभिनेत्रीलाही थर्ड स्टेज कँसर

मुंबई : अभिनेत्री सोनाली बेंद्रे आणि इरफान खाननंतर आता अभिनेत्री नफिसा अली यांनाही थर्ड स्टेज कँसर असल्याचं समोर आलं आहे. त्यांनी शनिवारी इंस्टाग्रामवर एक पोस्ट टाकत याची माहिती दिली. नफिसा यांनी माजी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींसोबतचा एक फोटो शेअर केला. त्यात असं म्हटल आहे की, “नुकतीच माझी जवळची मैत्रीण सोनिया गांधी यांना भेटली. यावेळी त्यांनी …

सोनाली, इरफाननंतर आता 'या' अभिनेत्रीलाही थर्ड स्टेज कँसर

मुंबई : अभिनेत्री सोनाली बेंद्रे आणि इरफान खाननंतर आता अभिनेत्री नफिसा अली यांनाही थर्ड स्टेज कँसर असल्याचं समोर आलं आहे. त्यांनी शनिवारी इंस्टाग्रामवर एक पोस्ट टाकत याची माहिती दिली. नफिसा यांनी माजी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींसोबतचा एक फोटो शेअर केला. त्यात असं म्हटल आहे की, “नुकतीच माझी जवळची मैत्रीण सोनिया गांधी यांना भेटली. यावेळी त्यांनी मला थर्ड स्टेज कँसरशी लढण्याची हिंमत दिली.”

 

View this post on Instagram

 

Just met my precious friend who wished me luck & to get well from my just diagnosed stage 3 cancer . ??

A post shared by nafisa ali sodhi (@nafisaalisodhi) on

नफिसा अली ह्या एक प्रसिद्ध मॉडेल आहेत. त्यांनी त्यांच्या बॉलिवूड करिअरमध्ये अमिताभ बच्चन, धर्मेंद्र ते सलमान खान अश्या बड्या-बड्या अभिनेत्यांसोबत काम केले आहे. नफिसा यांनी ‘मेजर साब’, ‘लाइफ इन अ मेट्रो’, ‘साहेब बीवी और गॅंगस्टर 3’, ‘यमला पगला दिवाना’ यांसारख्या चित्रपटांत काम केले आहे. नफिसा यांनी 1976 साली मिस इंडियाचा किताबही जिंकला होता. नफिसा यांचं लग्न प्रसिद्ध पोलो खेळाडू कर्नल ऍरीस सोढी यांच्याशी झालं होतं. त्यांना दोन मुली आणि एक मुलगा आहे.

काही महिन्यांपूर्वी, सोनाली बेंद्रे हिने आपल्याला कँसर असल्याचं सांगत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता, त्यानंतर इरफान खान यांना न्‍यूरो इंडोक्राइन ट्यूमर झाल्याचे समोर आले. त्यानंतर आता नफिसा यांना देखील कॅन्सरने आपल्या जाळ्यात अडकविले आहे. सोनाली बेंद्रे हिचा उपचार सध्या न्यूयॉर्कमध्ये सुरु आहे, तर इरफान खानचा उपचार लंडन येथे सुरु आहे.

कॅंसर हा एक भीषण आजार आहे. गेल्या वर्षी अभिनेता विनोद खन्ना यांचा कॅंसरमुळे मृत्यू झाला होता. तर याच महिन्यात केंद्रीय मंत्री अनंत कुमार यांचाही कॅंसरने मृत्यू झाला.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *