Akshay Kumar Birthday : चाहत्यांना रिटर्न गिफ्टमध्ये अक्षयकडून फीटनेस मंत्र

बॉलिवूडचा खिलाडी आणि सुपरस्टार अक्षय कुमार आज 52 वर्षांचा झाला (Akshay Kumars Birthday). या वयातही तो त्याच्या वयाच्या इतर अभिनेत्यांपेक्षा जास्त फीट आहे. इतकंच काय, तर तो दिवसेंदिवस आणखी फीट आणि तरुण होत चालला आहे (Akshay Kumar Fitness Secrete).

Akshay Kumar Birthday : चाहत्यांना रिटर्न गिफ्टमध्ये अक्षयकडून फीटनेस मंत्र

मुंबई : बॉलिवूडचा खिलाडी आणि सुपरस्टार अक्षय कुमार आज 52 वर्षांचा झाला (Akshay Kumars Birthday). या वयातही तो त्याच्या वयाच्या इतर अभिनेत्यांपेक्षा जास्त फीट आहे. इतकंच काय, तर तो दिवसेंदिवस आणखी फीट आणि तरुण होत चालला आहे (Akshay Kumar Fitness Secrete). वयाच्या पन्नाशीतही त्याने त्याची वेल टोन्ड बॉडी मेंटेन केली आहे. फीटनेसच्या बाबतीत अक्षय कुठल्या एथलीटपेक्षा कमी नाही.

अक्षय नेहमीच त्याचे फीटनेस व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असतो (Akshay Kumar). तो नेहमीच इतरांना आरोग्याविषयी जागरुक राहण्याचा सल्ला देत असतो. तो स्वत:ला नैसर्गिक पद्धतीने फीट ठेवतो (Akshay Kumar Fitness Secrete). तो जिमपेक्षा जास्त मार्शल आर्ट्स प्रॅक्टिस, धावणे इत्यादींना पसंती देतो. त्याशिवाय, तो त्याच्या आयुष्यात एक रुल काटकोरपणे पाळतो, तो म्हणजे कुठल्याही प्रकारचे सप्लिमेंट न घेणे. आज अक्षयच्या वाढदिवशी त्याने एक फोटो ट्वीट केला आणि लोकांना निरोगी आयुष्य जगण्याचा फीटसेनमंत्र दिला.

अक्षयने त्याचा एक ब्लॅक अँड व्हाईट फोटो ट्वीट केला. यामध्ये त्याची परफेक्ट बॉडी दिसत आहे. त्यासोबतच त्याने एक सल्लावजा कॅप्शनही दिलं. यामध्ये त्याने त्याच्या चाहत्यांना सप्लिमेंट न घेण्याचं आव्हान केलं. त्याऐवजी नैसर्गिक वस्तूंचं सेवन करण्याचा सल्ला अक्षयने दिला. ‘जर आपण आपल्या शरीरासोबत इमानदार राहू, तर ते या वयातही अशाप्रकारे फीट राहील ज्याबाबत कदाचित तुम्ही फक्त स्वप्नातच विचार केला असेल. स्वत:ची काळजी घ्या. एकच आयुष्य आहे, याला योग्य पद्धतीने जगा’, असं ट्वीट अक्षयने केलं.

अक्षय कुमारच्या मते हेल्दी आणि फीट राहण्यासाठी आपल्या खाण्या-पिण्यावर नियंत्रण ठेवणे अत्यंत महत्त्वाचं आहे. याच कारणामुळे अक्षय कुमार संध्याकाळी साडे सहा ते सात वाजेनंतर काहीही खात नाही. कारण, खाल्लेलं अन्न पचवण्यासाठी शरीराला 3 ते 4 तास लागतात. म्हणून अक्षय झोपायच्या 4 तासांपूर्वीच जेवून घेतो. जर संध्याकाळी सात वाजेनंतर तुम्हाला भूक लागत असेल, तर तुम्ही एग व्हाईटची भुर्जी किंवा ऑमलेट खाऊ शकता, तसेच सूप घेऊ शकता. पण कार्ब्स घेऊ नका, असा सल्ला अक्षय देतो. जर तुम्हीही अक्षयच्या लाईफस्टाईचा अवलंब आपल्या जीवनात कराल, तर तुम्हालाही त्याच्यासारखी वेल टोन्ड बॉडी बनवता येईल.

संबंधित बातम्या :

Akshay Kumar Birthday | ‘अक्की’च्या वाढदिनी यशराजची मोठी घोषणा, भव्य दिव्य ‘पृथ्वीराज’चा टीझर रिलीज

आता प्रियांका चोप्रालाही बाळंतपणाचे वेध

आजोबाकडून नातू लाँच, देओल घराण्याची तिसरी पिढी पडद्यावर

तू व्हर्जिनिटी कधी गमावलीस? आगाऊ चाहत्याला एलियाना डिक्रुझचं सडेतोड उत्तर

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *