तुम्ही देशासाठी खूप महत्त्वाचे, अक्षय कुमारचा अमित शाहांना मोलाचा सल्ला

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) ने नवी दिल्ली येथील एका कार्यक्रमात देशाचे गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांना एक मोलाचा सल्ला दिला.

Akshay Kumar advise Amit Shah, तुम्ही देशासाठी खूप महत्त्वाचे, अक्षय कुमारचा अमित शाहांना मोलाचा सल्ला

नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) ने नवी दिल्ली येथील एका कार्यक्रमात देशाचे गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांना एक मोलाचा सल्ला दिला. या कार्यक्रमात अक्षय कुमार आणि अमित शाह हे प्रमुख पाहुणे होते (Akshay Kumar advise Amit Shah). या कार्यक्रमादरम्यान आधी अक्षय कुमार बोलला, त्यानंतर अमित शाह बोलणार होते. यावेळी कार्यक्रमाच्या संचालकांनी अक्षय कुमारला विचारले की, जर त्यांना अमित शाहांना काही प्रश्न विचारायचे असतील तर ते विचारु शकतात. यावर अक्षय कुमारने गृहमंत्र्यांना प्रश्न नाही विचारला, पण त्यांना एक सल्ला दिला.

अक्षय कुमार म्हणाला, “मी अमित शाहांना सांगू इच्छितो की, त्यांनी सायंकाळी साडे सहा वाजेनंतर जेवण करु नये. सूर्यास्तानंतर अन्न ग्रहण करु नये, असं आपल्या शास्त्रातही सांगण्यात आलं आहे. यात काहीही चुकीचं नाही आणि हे तंदुरुस्त, निरोगी राहण्यासाठी आवश्यक आहे. अमित शाह हे देशासाठी एक महत्त्वपूर्ण व्यक्ती आहेत, त्यांनी त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यायला हवी”. या कार्यक्रमात अक्षयने अमित शाहांना आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला दिला.

या कार्यक्रमात उपस्थित प्रेक्षकांनी अक्षय कुमारला अमित शाहांची मुलाखत घेण्याचा आग्रह केला. यापूर्वीही अक्षय कुमारने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुलाखत घेतली होती. त्यामुळे त्यांनी अमित शाहांचीही मुलाखत घ्यावी असा आग्रह प्रेक्षकांचा होता.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *