ख्रिसमससाठी नवा धमाका, अक्षय कुमारच्या नव्या सिनेमाची घोषणा

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) यावर्षी एका नंतर एक चित्रपट करत आहे. नुकतेच अक्षयच्या 'मिशन मंगल' (Mission Mangal) चित्रपटाचा ट्रेलर लाँच झाला होता. त्यामुळे अक्षयच्या 'मिशन मंगल' चित्रपटाची बॉलिवूडमध्ये जोरदार चर्चा सुरु होती.

ख्रिसमससाठी नवा धमाका, अक्षय कुमारच्या नव्या सिनेमाची घोषणा

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) यावर्षी एका नंतर एक चित्रपट करत आहे. नुकतेच अक्षयच्या ‘मिशन मंगल’ (Mission Mangal) चित्रपटाचा ट्रेलर लाँच झाला होता. त्यामुळे अक्षयच्या ‘मिशन मंगल’ चित्रपटाची बॉलिवूडमध्ये जोरदार चर्चा सुरु होती. यानंतर पुन्हा एकदा अक्षय कुमारने आपल्या नव्या चित्रपटाचे एक पोस्टर लाँच केले आहे. यामध्ये अक्षयचा हटके लूक पाहून सर्वांना धक्का बसला आहे. अक्षयला या नव्या लूकमध्ये पाहून ओळखणेही कठीण होत आहे. त्याच्या नव्या चित्रपटाचे नाव ‘बच्चन पांडे’ असं आहे.

अक्षय कुमारचा (Akshay Kumar) ‘बच्चन पांडे’ चित्रपटातील नवा लूक पाहून सर्वत्र त्याच्या लूक बद्दल चर्चा सुरु आहे. या चित्रपटात अक्षयच्या गळ्यात मोठी चैन आणि काळी लुंगी घातलेली दिसत आहे. त्याच्या कपाळावरती चंदनचा टीळा आहे. तसेच अक्षयच्या हातात नान चाक दिसत आहे. अक्षय कुमारने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन त्याच्या नव्या चित्रपटाचा पोस्टर शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत अक्षयने लिहिले की, साजिद नाडियावाला यांच्या येणारा चित्रपट बच्चन पांडे 2020 मध्ये लाँच होणार आहे. ख्रिसमसच्या दिवशी हा चित्रपट प्रदर्शित होईल.

अक्षयच्या या नव्या लूकला चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणात पसंती मिळत आहे. हा चित्रपट 2020 मधील ख्रिसमसच्या दिवशी प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट अभिनेता आमिर खानचा चित्रपट ‘लाल सिंह चड्डाला’ टक्कर देईल. 2020 मध्ये ख्रिसमसच्या दिवशी अभिनेता अजय देवगन आणि रणबीर कपूरचाही चित्रपट प्रदर्शित होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

यापूर्वीही अक्षय कुमारच्या मिशन मंगल चित्रपटाचा ट्रेलर लाँच झाला होता. या चित्रपटात अक्षयसोबत अभिनेत्री विद्या बालन, तापसी पन्नू आणि सोनाक्षी सिन्हाही दिसणार आहे. हा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर चित्रपटाचे मोठ्या प्रमाणात कौतुकही करण्यात आले होते. याशिवाय अक्षय कुमार त्याच्या अनेक चित्रपटांसाठी सध्या काम करत आहे. ज्यामध्ये ‘सूर्यवंशी’, ‘हाऊसफुल 4’, ‘बॉम्बे लक्ष्मी’ आणि ‘गुड न्यूज’सारख्या चित्रपटाचा समावेश आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *