कपड्यांना आग लावून अक्षय कुमारची स्टेजवर एंट्री, खिलाडीचा थरारक व्हिडीओ

मुंबई : बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार हा त्याच्या थरारक स्टंट्ससाठी ओळखला जातो. त्याला खिलाडी का म्हणतात याचाच प्रत्यय आणणारी घटना आज घडली, जेव्हा स्वत:ला आग लावून अक्षय स्टेजवर उतरला. खरंच हे फक्त अक्षयचं करु शकतो. अक्षयच्या कपड्यांवर लागलेली आग बघून तिथे उपस्थित सर्वांचाच थरकाप उडाला. पण अक्षयने अगदी साहाजिकतेने रॅम्प वॉक केला. अॅमेझॉन प्राईम व्हिडीओच्या …

कपड्यांना आग लावून अक्षय कुमारची स्टेजवर एंट्री, खिलाडीचा थरारक व्हिडीओ

मुंबई : बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार हा त्याच्या थरारक स्टंट्ससाठी ओळखला जातो. त्याला खिलाडी का म्हणतात याचाच प्रत्यय आणणारी घटना आज घडली, जेव्हा स्वत:ला आग लावून अक्षय स्टेजवर उतरला. खरंच हे फक्त अक्षयचं करु शकतो. अक्षयच्या कपड्यांवर लागलेली आग बघून तिथे उपस्थित सर्वांचाच थरकाप उडाला. पण अक्षयने अगदी साहाजिकतेने रॅम्प वॉक केला.

अॅमेझॉन प्राईम व्हिडीओच्या नव्या वेब सिरीज ‘द एंड’मध्ये अक्षय मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ही एक थ्रीलर वेब सिरीज असणार आहे. ‘द एंड’च्या माध्यमातून अक्षय वेब सिरीजमध्ये पदार्पण करतो आहे. या वेब सिरीजच्या लीड अभिनेत्याच्या घोषणेसाठी एक कार्यक्रम ठेवण्यात आला होता. येथे अॅमेझॉन प्राईमने अक्षयला ‘द एंड’चा लीड अभिनेता असल्याचं घोषित केलं. त्यानंतर अक्षय कपड्यांना आग लावून स्टेजवर पोहोचला.

वेब सिरीजमध्ये काम करण्याबाबत अक्षय म्हणतो की, ‘माझा मुलगा आरव याने मला वेब सिरीज करण्याची आयडिया दिली. डिजीटल विश्वाने मला उत्साहित केलं आणि मी या वेब सिरीजच्या माध्यमातून या विश्वात पहिलं पाऊल टाकतो आहे याचा मला आनंद आहे. आरवने मला सांगितले होते की, मला डिजीटल विश्वात एंट्री करायला हवी, हे तरुण वर्गाच्या अधिक पसंतीस पडत आहे. डिजीटलच्या माध्यमातून मी काही नवीन करु इच्छितो आणि नेहमी नव्या तंत्रज्ञानाला आत्मसात करण्याचा प्रयत्न करतो.’

अक्षय कुमारचा हा स्टंट बघून तिथे उपस्थितांनी त्याची खूप वाहवा केली. मात्र, अक्षयची पत्नी ट्विंकल खन्ना ही त्याच्यावर चांगलीच नाराज झाली आहे. तिने ट्विटरवर आपला राग व्यक्त करत एक पोस्ट टाकली आहे. तिने अक्षयला चक्क मारण्याची धमकी दिली आहे. “बकवास! अशाप्रकारे तू स्वत:ला आग लावून घेतलीस, घरी ये, जर तू यातून वाचलास, तर मी तुझा जीव घेणार आहे! देवा माझी मदत कर.”


‘द एंड’ ही वेब सिरीज अॅमेझॉन प्राईम व्हिडिओज आणि अॅबेंडेन्शिया एंटरटेंमेंट बनवत आहे. या दोघांनी नुकतिच ‘ब्रीथ’ ही थ्रीलर वेब सिरीज बनवली, यामध्ये अभिनेता आर माधवन आणि अमित साध मुख्य भूमिकेत आहेत. याच्या पुढील भागात अभिनेता अभिषेक बच्चन हा मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

अॅमेझॉन प्राईम व्हिडिओच्या भारतात प्रदर्शित झालेल्या वेब सिरीजमध्ये इनसाइड एज, ब्रीथ, मिर्जापुर, फोर मोअर शॉट्स प्लीज आणि वेला राजा यांचा समावेश आहे. तर ‘मेड इन हेव्हन’ ही नवी सिरीज येणार आहे.

पाहा व्हिडीओ :

 

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *