‘केसरी’च्या ट्रेलरनंतर मीम्सचा पूर, पाकिस्तानवर निशाणा

मुंबई : बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारचा बहुप्रतिक्षित सिनेमा ‘केसरी’चा ट्रेलर आज प्रदर्शित झाला. अक्षयच्या केसरीच्या ट्रेलरची सर्वत्र चर्चा होत आहे. अनेकांनी सोशल मीडियावर हा ट्रेलर शेअर केला आहे. केसरी हा सिनेमा 1897 मधील सारगढी लढाईच्या सत्यकथेवर आधारित आहे. यामधील दमदार डायलॉगवर आता मीम्स देखील तयार होऊ लागले आहेत. हे डायलॉग पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या पुलवामा हल्ल्यात …

‘केसरी’च्या ट्रेलरनंतर मीम्सचा पूर, पाकिस्तानवर निशाणा

मुंबई : बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारचा बहुप्रतिक्षित सिनेमा ‘केसरी’चा ट्रेलर आज प्रदर्शित झाला. अक्षयच्या केसरीच्या ट्रेलरची सर्वत्र चर्चा होत आहे. अनेकांनी सोशल मीडियावर हा ट्रेलर शेअर केला आहे. केसरी हा सिनेमा 1897 मधील सारगढी लढाईच्या सत्यकथेवर आधारित आहे. यामधील दमदार डायलॉगवर आता मीम्स देखील तयार होऊ लागले आहेत. हे डायलॉग पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचा हात नसल्याच्या वक्तव्यांविरोधात वापरण्यात आले आहेत.

या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये अक्षयचा एक डायलॉग आहे, ‘चल झुठे’ म्हणजे ‘जा खोटारडा’. हा डायलॉग इम्रान खान यांच्या वक्तव्यांविरोधात मीम बनवण्यात वापरण्यात आला आहे. इम्रान खान त्यांच्या एका वक्तव्यात म्हणाले की, ‘पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा पाकिस्तानशी काहीही संबंध नाही’. यावर हे मीम बनवण्यात आले आहे.

तसेच, यात आणखी एक डायलॉग आहे, ‘वो 10 हजार हैं और हम 21’ म्हणजेच ‘ते 10 हजार आणि आम्ही 21’ हा डायलॉगही सध्या ट्रेंड करतो आहे.

या सिनेमाचा ट्रेलर आणि त्यातील अक्षय कुमारचा लुक बघून सिनेसृष्टीही भारावून गेली आहे. ट्रेलर बघितल्यानंतर अभिनेता अभिषेक बच्चन, अर्जून कपूर, दिलजीत दोसांझ, निल नितीन मुकेश, अभिनेत्री टिस्का चोप्रा यांनी ट्विटरवर अक्षय कुमार आणि या ट्रेलरचे भरभरुन कौतुक केलं आहे.

केसरी हा सिनेमा 1897 मधील सारगढी लढाईच्या सत्यकथेवर आधारित सिनेमा आहे. आतापर्यंतच्या साहसी लढाईंपैकी एक लढाई म्हणून सारगढी लढाई ओळखली जाते. केवळ 21 साहसी शीखांनी आपल्या क्षेत्राचं रक्षण करण्यासाठी 10 हजार अफगाणी शत्रूंविरोधात लढाई लढली होती. भगवी पगडी घालून या धाडसी सैनिकांनी आपलं साहस दाखवलं होतं.  शिखांचं नेतृत्व करणाऱ्या हवालदार ईशर सिंहने मृत्यूपर्यंत युद्ध करण्याचं ठरवलं होतं. हीच थरारक कथा दिग्दर्शक अनुराग सिंग मोठ्या पडद्यावर घेऊन येत आहे. अभिनेता अक्षय कुमार आणि अभिनेत्री परिणीती चोप्रा यांनी या सिनेमात प्रमुख भूमिका साकारली आहे.  येत्या 21 मार्चला हा सिनेमा रिलीज होणार आहे.

VIDEO: Kesari | Official Trailer 

 

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *