अक्षय कुमार थेट सलमानला भिडणार, ‘सूर्यवंशी’ ईदला प्रदर्शित करणार

मुंबई : दिग्दर्शक रोहित शेट्टी ‘सिम्बा’नंतर पुन्हा एकदा एक दमदार सिनेमा ‘सूर्यवंशी’ घेऊन येत आहे. या सिनेमात अभिनेता अक्षय कुमार हा मुख्य भूमिकेत असणार आहे. या सिनेमाची एक झलक ‘सिम्बा’ या सिनेमात दाखवण्यात आली होती. या सिनेमाबाबत आता एक आश्चर्यकारक माहिती समोर येत आहे. हा सिनेमा पुढच्या वर्षी ईदला प्रदर्शित होणार आहे. तसं तर ईदला …

अक्षय कुमार थेट सलमानला भिडणार, ‘सूर्यवंशी’ ईदला प्रदर्शित करणार

मुंबई : दिग्दर्शक रोहित शेट्टी ‘सिम्बा’नंतर पुन्हा एकदा एक दमदार सिनेमा ‘सूर्यवंशी’ घेऊन येत आहे. या सिनेमात अभिनेता अक्षय कुमार हा मुख्य भूमिकेत असणार आहे. या सिनेमाची एक झलक ‘सिम्बा’ या सिनेमात दाखवण्यात आली होती. या सिनेमाबाबत आता एक आश्चर्यकारक माहिती समोर येत आहे. हा सिनेमा पुढच्या वर्षी ईदला प्रदर्शित होणार आहे. तसं तर ईदला फक्त अभिनेता सलमान खानचा सिनेमाच प्रदर्शित होतो. मात्र, यावेळी ईदला अक्षय कुमारचा ‘सूर्यवंशी’ही प्रदर्शित होणार आहे. अक्षय कुमारने या सिनेमाचा फर्स्ट लूक शेअर करत याबाबतची माहिती दिली.

अक्षय कुमार आणि सलमान खान यांच्यात चांगली मैत्री आहे. दोघांनी सोबत अनेक सिनेमेही केले आहेत. त्यामुळे जेव्हा रोहित शेट्टीने ‘सूर्यवंशी’ सिनेमा हा 2020 च्या ईदला प्रदर्शित होणार असल्याची माहिती दिली, तेव्हा सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. कारण बॉलिवूडमध्ये ईदच्या दिवशी फक्त सलमान खानचा सिनेमा प्रदर्शित होतो. त्यामुळे आता बॉलिवूडमध्ये एक नवा वाद उद्भवण्याची चिन्हे आहेत.

यादरम्यान अक्षयने ईदला सिनेमा प्रदर्शित करण्याचा निर्णय घेण्याआधी सलमान खानशी नक्की चर्चा केली असावी, असं मानलं जात होत. मात्र, अक्षयने सलमानला काहीही न विचारता हा निर्णय घेतल्याचं त्याने स्वत: स्पष्ट केलं. एका इव्हेंटदरम्यान हा निर्णय घेण्याआधी सलमानशी चर्चा केली होती का? असा प्रश्न अक्षयला विचारण्यात आला. तेव्हा अक्षयने नकार दिला. त्यामुळे आता भाईजान यावर काय पाऊल उचलतात याकडे संपूर्ण बॉलिवूडचं लक्ष लागलेलं आहे.

सलमान खान आणि अक्षय कुमारने यापूर्वी ‘मुझसे शादी करोगी’,  ‘जानेमन’ आणि ‘तीस मार खाँ’ सारख्या सिनेमांत एकत्र काम केलं आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *