माझ्यावरील आरोप खोटे, या षडयंत्रामागे सरोज खान यांचा हात : गणेश आचार्य

प्रसिद्ध डान्स कोरिओग्राफर गणेश आचार्य यांनी त्यांच्यावरील सर्व आरोप खोटे असल्याचा दावा केला आहे (Ganesh Acharya on allegations of Beating Up Dancer).

Allegations of Ganesh Acharya on Saroj Khan, माझ्यावरील आरोप खोटे, या षडयंत्रामागे सरोज खान यांचा हात : गणेश आचार्य

मुंबई : प्रसिद्ध डान्स कोरिओग्राफर गणेश आचार्य यांनी त्यांच्यावरील सर्व आरोप खोटे असल्याचा दावा केला आहे (Ganesh Acharya on allegations of Beating Up Dancer). तसेच या सर्व कारस्थानामागे ज्येष्ठ नृत्यांगना सरोज खान आणि त्यांचे सहकारी असल्याचा आरोप केला आहे. सोमवारी (28 जानेवारी) दिव्या कोटीयन नावाच्या कोरिओग्राफरने गणेश आचार्य यांच्यावर इतर दोन मुलींकडून मारहाण आणि शिवीगाळ केल्याचा आरोप केला होता. यावर आचार्य यांनी ही प्रतिक्रिया दिली.

गणेश आचार्य म्हणाले, “दिव्या कोण आहे हे मला माहिती नाही. मी तिच्यासोबत काम केलेलं नाही. ती डान्स मास्टर्स असोसिएशनमध्ये असिस्टंट होती हे मला माहिती आहे. तिने डान्स मास्टर्स असोसिएशनच्या लोकांविरुद्ध तक्रार केली आहे. मी तिथं जनरल सेक्रेटरी आहे. तिच्या त्या गोष्टीवरुन तिचं कार्ड रद्द केलं आहे. त्यानंतर ती हसत हसत आपलं कार्ड घेऊन गेली आहे.”

Allegations of Ganesh Acharya on Saroj Khan, माझ्यावरील आरोप खोटे, या षडयंत्रामागे सरोज खान यांचा हात : गणेश आचार्य

26 जानेवारीला संबंधित ठिकाणावर मी कामासाठी आलो. तेथे ती बाहेर उभी होती. मला तेथील काम आटोपून पुढे यायचं होतं. मी त्यासाठी निघून आलो. त्यानंतर तेथे काय झालं हे मला माहिती नाही. तिने जे आरोप केले ते का केले हे मला कळत नाही, असंही गणेशा आचार्य म्हणाले.

पीडित तरुणीने गणेश आचार्य यांच्यावर ऑफिसमध्ये बोलावून पॉर्न व्हिडीओ पाहायला सांगितल्याचेही गंभीर आरोप केले आहेत. पॉर्न व्हिडीओ पाहण्यास नकार दिल्यावर गणेश आचार्य भडकले. त्यांनी काम करु दिलं नाही आणि युनिअनमधून काढलं, असाही आरोप गणेश आचार्य यांच्यावर करण्यात आला आहे. या आरोपांवर गणेश आचार्य म्हणाले, “असं तर कुणीही येऊन बोलेल. असे 10 जण उभे राहतील. मी तिच्यावर अब्रूनुकसानीचा खटला दाखल करणार आहे. मी तिला कोर्टात खेचेल.”

या षडयंत्रामागे सरोज खान यांचा हात : गणेश आचार्य

गणेश आचार्य यांनी या आरोपांमागे ज्येष्ठ नृत्यांगना सरोज खान आणि त्यांचे सहकारी असल्याचा आरोप केला आहे. ते म्हणाले, “या आरोपांमागे सिने डान्सर असोसिएशनचे जुने नेते जाहिद, रवी, डान्स कोऑर्डिनेटर राज, सरोज खान आणि ही दिव्या कोटीयन आहे. त्यांच्या ऑफिसचा मुद्दा सुरु आहे. राजसह 3 जण फेडरेशनमध्ये 15-15 लाख रुपये देऊन कोऑर्डिनेटर बनले आहेत. ते लोक आमच्याच लोकांना काम द्या म्हणून डान्स मास्टर्सला जाऊन त्रास देतात.”

डान्सरला दिल्या जाणाऱ्या त्रासाविरोधात मी एकटा कोरिओग्राफर लढाई लढत आहे. या 400 ते 500 डान्सरने आपली वेगळी युनियन उघडली. त्यामुळे या जुन्या लोकांचं खाणंपिणं बंद झालं. म्हणून हे लोक सरोज खान यांच्या माध्यमातून माझ्याविरोधात हल्लाबोल करत आहेत. मात्र, मी मागे हटणार नाही. मी या डान्सर लोकांसाठी लढणार आहे, असंही गणेश आचार्य म्हणाले.

“मागे पळणार नाही, डान्सर लोकांना त्रास देणाऱ्यांना धडा शिकवेल”

गणेश आचार्य म्हणाले, “माझं काम बोलतंय. मी शेवटी गुड न्यूज, तान्हाजी सारखे सिनेमे दिले. मी काम करतो आहे. सर्व इंडस्ट्रीवाल्यांना मी कसा आहे हे माहिती आहे. मी डान्सर लोकांसाठी, मास्टर्स लोकांसाठी किती करतो हे त्यांना माहिती आहे. मला हे बोलयची देखील गरज नाही. मी या कोणत्याही गोष्टीने मागे पळणार नाही. मी डान्सर लोकांना त्रास देणाऱ्यांना धडा शिकवेल.”

संबंधित बातम्या :

कोरिओग्राफर गणेश आचार्यंवर गुन्हा, डान्सर तरुणीला मारहाणीचा आरोप

व्हिडीओ :

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *