Amit Wadhwani | ‘पीएम नरेंद्र मोदी’ बायोपिक पुनर्प्रदर्शनचा निर्णय, निर्मात्याला जीवे मारण्याची धमकी!

Amit Wadhwani | ‘पीएम नरेंद्र मोदी’ बायोपिक पुनर्प्रदर्शनचा निर्णय, निर्मात्याला जीवे मारण्याची धमकी!

चित्रपटगृहे सुरू झाल्यानंतर काही प्रदर्शित झालेले चित्रपट पुन्हा एकदा प्रदर्शित करण्यात येणार आहेत.

Harshada Bhirvandekar

|

Oct 15, 2020 | 6:16 PM

मुंबई : कोरोना विषाणूच्या संक्रमणामुळे गेले अनेक महिने देशभरातील चित्रपटगृह बंद होती. सध्या देशात ‘अनलॉक’चा 5वा टप्पा सुरू झाला आहे. या अंतर्गत 15 ऑक्टोबरपासून चित्रपटगृहे सुरू करण्यास सशर्त परवानगी देण्यात आली होती. चित्रपटगृहे सुरू झाल्यानंतर काही प्रदर्शित झालेले चित्रपट पुन्हा एकदा प्रदर्शित करण्यात येणार आहेत. यात विवेक ओबेरॉय अभिनित ‘पीएम नरेंद्र मोदी’ हा बयोपिक पुन्हा एकदा प्रदर्शित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानंतर चित्रपटाचे निर्माते अमित वाधवानी (Amit Wadhawani) यांनी जीवे मारण्याच्या धमक्या देणारे फोन येऊ लागले आहेत. (Amit Wadhwani Producer of PM Narendra Modi biopic receives death threats)

लॉकडाऊन घोषित झाल्याने त्याच दरम्यान प्रदर्शित झालेल्या चित्रपटांना मोठा फटका बसला आहे. चित्रपटगृहे बंद झाल्याने हे चित्रपट फार काळ चालले नाहीत. म्हणूनच, काही चित्रपट पुन्हा एकदा प्रदर्शित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, या निर्णयानंतर ‘पीएम नरेंद्र मोदी’ या बायोपिकचे निर्माते अमित वाधवानी यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना फोनवरून जीवे मारण्याची धमकी दिली गेली आहे. यासंदर्भात त्यांनी चेंबूर पोलीस स्थानकात अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

सायबरबुलिंगची घटना

याबद्दल अमित वाधवानी यांनी माध्यमांशी बातचीत केली. ते म्हणाले, ‘कुठलाही संवेदनशील विषय किंवा नकारात्मकता पसरवणारा विषय नसतानाही मला धमकी दिली जात आहे. हा केवळ एक चित्रपट आहे, तोही खुद्द पंतप्रधानांच्या आयुष्यावर बेतलेला. या प्रकारच्या घटनेने मला खूप धक्का बसला आहे. माझा चित्रपट पुन्हा एकदा प्रदर्शित होण्याने कोणाला कुठलेही नुकसान होणार नव्हते. नियम पाळून गोष्टी करणाऱ्या आमच्यासारख्या लोकांसोबत अशी घटना घडणे, खरेच दुर्भाग्यपूर्ण आहे. यामुळे अजूनही सायबर बुलिंगची प्रकरणे सुरूच असल्याचे दिसून येते आहे. (Amit Wadhwani Producer of PM Narendra Modi biopic receives death threats)

बॉलिवूड निर्मात्यांना लॉकडाऊनचा फटका

लॉकडाऊन दरम्यान आलेल्या समस्यांबद्दल बोलताना त्यांनी सगळ्याच चित्रपट निर्मात्यांची सद्य परिस्थिती मांडली. ते म्हणतात, ‘चित्रपट निर्माते नेहमीच अजेंडाचे बळी ठरतात. इतका पैसा लावूनही, बॉलिवूडमध्ये त्यांना सॉफ्ट टार्गेट केले जाते. बॉलिवूडला एका कलाकृतीच्या दृष्टीकोनातून बघण्याऐवजी राजकीय दृष्टीकोनातून पाहिले जाते. त्यामुळे सध्या वादांचे प्रमाण वाढले आहे आणि प्रेक्षकही याने प्रभावित होत आहेत. लॉकडाऊनमुळे मनोरंजन विश्वाचे कंबरडे पूर्णपणे मोडले आहे.’

(Amit Wadhwani Producer of PM Narendra Modi biopic receives death threats)

संबंधित बातम्या : 

‘पंतप्रधान मोदी निर्मनुष्य बोगद्यात कोणाला हात दाखवत होते, त्यांची तब्येत बिघडलेय का?’

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें