अनिल कपूरला ‘या’ खेळाडूच्या बायोपिकमध्ये काम करायचयं

मुंबई : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता अनिल कपूर यांना क्रिकेटचा देव सचिन तेंडूलकरच्या बायोपिकमध्ये काम करण्याची इच्छा आहे. अनिल कपूर यांनी वृत्तसंस्था आयएएनएसला दिलेल्या एका मुलाखतीत ही इच्छा व्यक्त केली. तुम्हाला कुठल्या खेळाडूच्या बायोपिकमध्ये काम करायला आवडेल या प्रश्नावर त्यांनी सचिन तेंडूलकरचे नाव घेतले. सोबतच ते सचिनचे चाहते असल्याचंही त्यांनी सांगितलं. या शुक्रवारी 22 फेब्रुवारीला अनिल …

अनिल कपूरला ‘या’ खेळाडूच्या बायोपिकमध्ये काम करायचयं

मुंबई : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता अनिल कपूर यांना क्रिकेटचा देव सचिन तेंडूलकरच्या बायोपिकमध्ये काम करण्याची इच्छा आहे. अनिल कपूर यांनी वृत्तसंस्था आयएएनएसला दिलेल्या एका मुलाखतीत ही इच्छा व्यक्त केली. तुम्हाला कुठल्या खेळाडूच्या बायोपिकमध्ये काम करायला आवडेल या प्रश्नावर त्यांनी सचिन तेंडूलकरचे नाव घेतले. सोबतच ते सचिनचे चाहते असल्याचंही त्यांनी सांगितलं.

या शुक्रवारी 22 फेब्रुवारीला अनिल कपूर यांचा ‘टोटल धमाल’ हा सिनेमा प्रदर्शित झाला. हा सिनेमा ‘धमाल’ या सिनेमाचा तिसरा सीक्वल आहे. सिनेमाच्या पहिल्या भागात अभिनेता संजय दत्त, अरशद वारसी, जावेद जाफरी, रीतेश देशमुख यांची प्रमुख भूमिका होती. या सिनेमाचा तिसरा भाग म्हणजेच ‘टोटल धमाल’ हा एक मल्टीस्टारर सिनेमा आहे. या सिनेमात अभिनेता अजय देवगन, बोमन ईराणी, अरशद वारसी, जावेद जाफरी, रीतेश देशमुख आणि अभिनेत्री माधुरी दीक्षित, इशा गुप्ता यांची प्रमुख भूमिका आहे.

अनेक वर्षांनी प्रेक्षकांना माधुरी आणि अनिल कपूर एकत्र बघायला मिळणार आहेत. माधुरीसोबत पुन्हा काम करुन कसं वाटलं, असं विचारल्यावर, “माधुरीसोबत काम करणं खूप जबरदस्त होतं. ती सिनेसृष्टीतील उत्कृष्ट अभिनेत्रींपैकी एक आहे”, असे अनिल कपूर म्हणाले.

VIDEO : 

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *