VIDEO: अर्नोल्ड श्वार्झनेगर यांच्यावर भर स्पर्धेत अज्ञात व्यक्तीकडून हल्ला

केप टाऊन दक्षिण आफ्रिका : हॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता, बॉडीबिल्डर, मॉडल अनॉर्ल्ड श्वॉर्झनेगर यांच्यावर एका अज्ञात व्यक्तीने हल्ला चढवला आहे. सध्या या हल्ल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ एका क्रिडा स्पर्धेदरम्यान असल्याचं सांगितलं जात आहे. हॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता अर्नोल्ड श्वॉर्झनेगर गेल्या काही दिवसांपासून विविध क्रीडा स्पर्धेत स्पर्धकांचा उत्साह वाढवण्यासाठी जात आहे. …

VIDEO: अर्नोल्ड श्वार्झनेगर यांच्यावर भर स्पर्धेत अज्ञात व्यक्तीकडून हल्ला

केप टाऊन दक्षिण आफ्रिका : हॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता, बॉडीबिल्डर, मॉडल अनॉर्ल्ड श्वॉर्झनेगर यांच्यावर एका अज्ञात व्यक्तीने हल्ला चढवला आहे. सध्या या हल्ल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ एका क्रिडा स्पर्धेदरम्यान असल्याचं सांगितलं जात आहे.

हॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता अर्नोल्ड श्वॉर्झनेगर गेल्या काही दिवसांपासून विविध क्रीडा स्पर्धेत स्पर्धकांचा उत्साह वाढवण्यासाठी जात आहे. काही दिवसांपूर्वी अर्नोल्ड श्वॉर्झनेगर दक्षिण आफ्रिकेतील एका क्रीडा स्पर्धेत गेले होते. त्यादरम्यान एका अज्ञात व्यक्तीने मागून त्यांच्या लाथ मारली. ही लाथ इतकी जबरदस्त होती की, त्यांच्या कंबरेत दुखापत झाली. या प्रकारामुळे अर्नोल्ड काही वेळ थक्क झाले. या हल्ल्यानंतर अर्नोल्ड यांच्या सुरक्षारक्षकांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आहे. या हल्ल्यानंतर अर्नोल्ड यांनी ट्विट करत मी ठिक आहे, मला कोणतीही दुखापत झाली नसल्याचे त्याच्या चाहत्यांना सांगितले.

स्पर्धेच्या ठिकाणी फार गर्दी असल्याने सुरुवातीला मला कोणीतरी धक्का दिला आहे असे मला वाटले. मात्र नंतर व्हायरल झालेले व्हिडीओ पाहिल्यावर मला कोणीतरी लाथ मारल्याचे दिसलं. असे अर्नोल्ड यांनी ट्विट करत म्हटलं.

त्याशिवाय त्याने त्याच्या चाहत्यांना ”या अशा व्हिडीओवर लक्ष देण्यापेक्षा स्पर्धांवर लक्ष द्या असेही सांगितलं आहे. मी स्पर्धांचे व्हिडीओ स्नॅपचॅटवर शेअर केले आहेत. हे व्हिडीओ तुम्हीही शेअर करा” असेही अर्नोल्ड यांनी चाहत्यांना सांगितलं आहे.

दक्षिण आफ्रिकेत दरवर्षी मे महिन्यात अर्नोल्ड क्लासिक आफ्रिका या क्रीडा स्पर्धेचे आयोजन केले जाते. या स्पर्धेत बॉडी बिल्डींग यांसह इतर खेळांचा समावेश असतो.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *