Aryan Khan: ‘भाऊ अबरामला आर्यनकडून वाढदिवसाची परफेक्ट भेट’; क्लीन चिट मिळताच शाहरुखच्या चाहत्यांनी व्यक्त केला आनंद

Aryan Khan: 'भाऊ अबरामला आर्यनकडून वाढदिवसाची परफेक्ट भेट'; क्लीन चिट मिळताच शाहरुखच्या चाहत्यांनी व्यक्त केला आनंद
Aryan Khan and Abram
Image Credit source: Instagram

आर्यनकडे कोणतेही ड्रग्ज सापडले नसल्याचं आरोपपत्रात नमूद करण्यात आलं आहे. योगायोगाने आजच आर्यनचा भाऊ आणि शाहरुखचा धाकटा मुलगा अबराम खान (AbRam Khan) याचा वाढदिवस आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: स्वाती वेमूल

May 27, 2022 | 4:27 PM

कॉर्डेलिया क्रूझवरील ड्रग्ज प्रकरणी (Aryan Khan Drugs Case) आज (27 मे) नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB) अभिनेता शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) मुलगा आर्यन खान आणि इतर पाच जणांना दोषमुक्त केलं. गेल्या वर्षी 2 ऑक्टोबर रोजी मुंबईतील कॉर्डेलिया क्रूझवर एनसीबीने छापा टाकला होता. याप्रकरणी आता 14 जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. आर्यनकडे कोणतेही ड्रग्ज सापडले नसल्याचं आरोपपत्रात नमूद करण्यात आलं आहे. योगायोगाने आजच आर्यनचा भाऊ आणि शाहरुखचा धाकटा मुलगा अबराम खान (AbRam Khan) याचा वाढदिवस आहे. शाहरुखच्या चाहत्यांनी आर्यनला क्लीन चिट मिळाल्याप्रकरणी आनंद व्यक्त करत अबरामसाठी ही वाढदिवसाची उत्तम भेट ठरल्याचं म्हटलंय.

एनसीबीने क्रूझवर छापा टाकल्यानंतर आर्यनसह इतर सहा जणांना अटक केली होती. आर्यनने जवळपास एक महिना तुरुंगात घालवला होता. एनसीबीकडून या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू होती. आर्यनला या प्रकरणात गोवण्यात आलं असावं आणि पैसे उकळण्याचा प्रयत्न केला गेला असावा, असा आरोपही झाले. त्यानंतर या प्रकरणाचा तपास विशेष तपास पथकाकडे (एसआयटी) वर्ग करण्यात आला.

शाहरुखच्या चाहत्यांचे ट्विट्स-

आर्यनला क्लिन चिट मिळाल्याचं कळताच शाहरुख खानच्या चाहत्यांनी आनंद व्यक्त केला. ‘SRK आणि त्यच्या संपूर्ण कुटुंबासाठी हा आनंदाचा दिवस आहे. अबरामच्या वाढदिवसाचा आनंद द्विगुणीत झाला,’ असं एकाने लिहिलं. तर आर्यनकडून त्याच्या भावासाठी ही परफेक्ट भेट आहे, असं दुसऱ्या युजरने म्हटलं. आर्यनच्या क्लिन चिटची बातमी येण्यापूर्वी शाहरुखची पत्नी गौरी खानने व्हिडीओ शेअर करत अबरामला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. अबराम आता नऊ वर्षांचा झाला आहे.

आर्यनला नुकतंच करण जोहरच्या बर्थडे पार्टीत पाहिलं गेलं. शाहरुखची मुलगी आणि आर्यनची बहीण सुहाना खान सध्या तिच्या बॉलिवूड पदार्पणाच्या चित्रपटासाठी उटीमध्ये शूटिंग करत आहे. आर्यनने चित्रपटाच्या सेटवर जाऊन तिची खास भेट घेतली. या भेटीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

हे सुद्धा वाचा


Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें