आयुष्मानचा ‘शुभ मंगल ज्यादा सावधान’चा ट्रेलर अखेर प्रदर्शित

हा सिनेमा 2017 मधील आयुष्मान आणि अभिनेत्री भूमी पेडणेकरच्या ‘शुभ मंगल सावधान’चा स्पिन ऑफ आहे. या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये आयुष्मान हा समलैंगिक प्रेमीच्या भूमिकेत दिसतो आहे.

आयुष्मानचा ‘शुभ मंगल ज्यादा सावधान’चा ट्रेलर अखेर प्रदर्शित
Follow us
| Updated on: Jan 20, 2020 | 5:09 PM

मुंबई : बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुराना याच्या बहुप्रतिक्षित ‘शुभ मंगल ज्यादा सावधान’चा ट्रेलर अखेर प्रदर्शित झाला आहे (Shubh Mangal Zyada Saavdhan Trailer). हा सिनेमा 2017 मधील आयुष्मान आणि अभिनेत्री भूमी पेडणेकरच्या ‘शुभ मंगल सावधान’चा स्पिन ऑफ आहे. या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये आयुष्मान हा समलैंगिक प्रेमीच्या भूमिकेत दिसतो आहे. यामध्ये त्याच्यासोबत अभिनेता जितेंद्र कुमार हा प्रेमीच्या भूमिकेत आहे (Shubh Mangal Zyada Saavdhan Trailer).

आयुष्मान आणि जितेंद्र व्यतिरिक्त या सिनेमात ‘बधाई हो’ या सिनेमातील आपल्या विनोदी अभिनयाने सर्वांची मनं जिंकलेले अभिनेत्री नीना गुप्ता आणि अभिनेता गजराज राव यांची जोडी पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. त्यामुळे हा सिनेमा प्रेक्षकांना पोट धरुन हसायला लावणार हे नक्की. सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित होताच काहीच मिनिटांमध्ये या सिनेमाने लाखो व्ह्यूज मिळवले.

आयुष्यमान जो ही सिनेमा हाती घेतो त्याची कथा ही नेहमी हटके असते. हाच आयुष्मानचा युएसपी आहे. त्यामुळे आयुष्मानने खूप कमी कालावधीत सिनेसृष्टीत त्याचं एक वेगळं स्थान कमावलं आहे. आयुष्मानचा चाहता वर्गही खूप मोठा आहे. त्याचे चाहते नेहमीच त्याच्या सिनेमांची वाट पाहत असतात. ‘शुभ मंगल ज्यादा सावधान’ची टीझर प्रदर्शित झाल्यापासूनच या सिनेमाच्या ट्रेलरची उत्सुकता सर्वांना लागून होती.

त्यानंतर अखेर या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झालाय आयुष्मानने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर या सिनेमाचं पोस्टर शेअर करत लवकरच ट्रेलर प्रदर्शत होणार असल्याची माहिती दिली होती. तसेच, हा सिनेमा एक कौटुंबिक सिनेमा असून समाजात एक महत्त्वाचा संदेश देण्यासाठी तयार करण्यात आला आहे.

‘शुभ मंगल ज्यादा सावधान’ या सिनेमाचं दिग्दर्शन हितेश केवालिया यांनी केलं आहे. तर आनंद एल राय हे या सिनेमाचे निर्माते आहेत. येत्या 21 फेब्रुवारी हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.