Rana Daggubati | मृत्यूच्या दारातून परतलो, खालावलेल्या प्रकृतीविषयी राणा दग्गुबातीची अखेर कबुली

गेल्या वर्षी 70 टक्के स्ट्रोक किंवा हॅमरेजची भीती होती, तर 30 टक्के थेट मृत्यूची शक्यता होती, असं राणा दग्गुबातीने सांगितलं

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 12:45 PM, 24 Nov 2020

मुंबई : ‘बाहुबली’स्टार राणा दग्गुबाती (Rana Daggubati) याने आपल्या तब्येतीविषयी धक्कादायक माहिती सांगितली. गेल्या वर्षी आपण मृत्यूच्या दारातून परत आल्याचं सांगताना राणाच्या डोळ्यात अश्रू तरळले होते. बाहुबली चित्रपटात पिळदार शरीरयष्टीच्या भल्लादेवच्या भूमिकेने राणा दग्गुबाती प्रसिद्ध आहे. राणाच्या खालावलेल्या प्रकृतीविषयी उलटसुलट चर्चा रंगल्या असतानाच पहिल्यांदाच त्याने स्वतःहून मौन सोडलं. (Baahubali Star Rana Daggubati reveals his severe illness amid tears in Samantha Akkineni Chat Show)

अभिनेत्री समन्था अक्कीनेनीच्या (Samantha Akkineni) ‘सॅम जॅम’ (Sam Jam) या नव्या चॅट शोमध्ये राणा दग्गुबाती सहभागी झाला होता. “आयुष्य जेव्हा फास्ट फॉरवर्डमध्ये धावत असतं, तेव्हा अचानक एक पॉझ बटन लागतं. ब्लड प्रेशरचा त्रास होता, हृदयाभोवती कॅल्शियमचं आवरण तयार झालं होतं. किडनी फेल झाली होती. 70 टक्के स्ट्रोक किंवा हॅमरेजची भीती होती, तर 30 टक्के थेट मृत्यूची शक्यता वर्तवली होती.” असं राणा सांगत असल्याचं ‘सॅम जॅम’च्या प्रोमोमध्ये दिसतं.

“तुझ्याभोवती अनेक जण कुरबुर करत होते, पण तू खडकासारखा निश्चल होतास, मी हे माझ्या डोळ्यांनी पाहिले आहे आणि म्हणूनच तू माझ्यासाठी सुपरहिरो आहेस” अशा भावना भावूक झालेल्या समन्थाने व्यक्त केल्या.

राणा दग्गुबातीने लॉकडाऊनमध्येच गर्लफ्रेण्ड मिहिका बजाजसोबत लग्नगाठ बांधली. 8 ऑगस्टला हैद्राबादच्या रामानायडू स्टुडिओमध्ये राणा आणि मिहिकाचे लग्न पार पडले.

दोन वर्षांपूर्वी शेअर केलेल्या फोटोंमध्ये दिसणारा शिडशिडीत राणा पाहून चाहते अवाक झाले होते. अनेकांनी काळजीपोटी त्याच्या तब्येतीची विचारपूस केली होती. “माझ्या प्रकृतीबद्दल चित्रविचित्र गोष्टी ऐकत आहे. मी व्यवस्थित आहे. मला ब्लड प्रेशरचा जरासा त्रास आहे. पण मी लवकरच बरा होईन. तुम्ही व्यक्त केलेल्या काळजी आणि प्रेमाबद्दल आभार, पण माझ्या तब्येतीबद्दल कोणतेही अंदाज वर्तवू नका” असं राणाने जून 2018 मध्ये ट्विटरवर लिहिलं होतं. (Baahubali Star Rana Daggubati reveals his severe illness amid tears in Samantha Akkineni Chat Show)

35 वर्षांच्या राणा दग्गुबातीने हाऊसफुल्ल 4, दम मारो दम, बेबी अशा हिंदी चित्रपटातही काम केले आहे. मात्र मुख्यत्वे तेलुगु आणि तमिळ सिनेमात तो झळकला. त्याचे वडील दग्गुबाती सुरेश बाबू हे तेलुगु चित्रपट निर्माते आणि वितरक आहेत.

संबंधित बातम्या :

‘भल्लालदेव’ला प्रेम गवसलं, अभिनेता राणा दग्गुबाती रिलेशनशिपमध्ये, कोण आहे मिहिका?

भल्लालदेवचा शानदार विवाहसोहळा, अभिनेता राणा दग्गुबातीच्या लग्नाचे फोटो

(Baahubali Star Rana Daggubati reveals his severe illness amid tears in Samantha Akkineni Chat Show)