'भारत'कडून बॉक्स ऑफिसवरील 6 विक्रम मोडित

भारत चित्रपट 2019 या वर्षातील पहिल्याच दिवशी विक्रमी कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. यंदाच्या वर्षात सर्वाधिक कमाई avengers endgame या हॉलिवूड चित्रपटाने केली होती.

'भारत'कडून बॉक्स ऑफिसवरील 6 विक्रम मोडित

सलमानने पुन्हा एकदा भारत चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्य 6 नवे रेकॉर्ड आपल्या नावावर नोंद केले आहेत. वर्ल्डकप दरम्यान सलमानचा चित्रपट 5 जून रोजी प्रदर्शित झाला आणि पहिल्याच दिवशी 42.30 कोटी रुपयांची कमाई कलमाने केली आहे. या वर्षातील सर्वात मोठी ओपिनंग या चित्रपटाने केली आहे. यासोबतच बॉक्स ऑफिसवर सलमानच्या चित्रपटाने अनेक नवीन रेकॉर्ड केले आहेत.

सलमान-कतरीना कैफ-अब्बस जफर यांच्या करिअरमधील सर्वात मोठी ओपनिंग

सलमान खान आणि कतरीनाच्या जोडीला चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणात पंसती दिली जाते. या जोडीने आतपर्यंत अनेक हिट चित्रपटही दिले आहेत. आता पुन्हा एकदा भारत चित्रपटात ही जोडी प्रेक्षकांच्या समोर येत आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालेल यात काही शंका नाही. भारत चित्रपटाने सलमान-कतरीना- अली अब्बस यांच्या नावावर नवी रेकॉर्ड नोंद झाला आहे. यापूर्वी सलमान-कतरीनाचा टायगर जिंदा है चित्रटाच्या नावावर विक्रमी कमाई केल्याची नोंद होती.

वर्ष 2019 मध्ये पहिल्या दिवशी विक्रमी कमाई करणारा दुसरा चित्रपट

भारत चित्रपट वर्ष 2019 मधील पहिल्याच दिवशी विक्रमी कमाई करणारा चित्रपट आहे. पहिल्या नंबरवर हॉलिवूड चित्रपट अॅव्हेंजर्स अँड गेमने कब्जा केला आहे. अॅव्हेंजर्स अँड गेमने पहिल्याच दिवशी 53 कोटी रुपयांची कमाई केली होती. अँडगेम भारतात चार भाषांमध्ये प्रदर्शित केला होता.

ईदच्या दिवशी प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांचा रेकॉर्ड ब्रेक

सलमान खान दरवर्षी चाहत्यांसाठी ईदच्या दिवशी नवीन चित्रपट घेऊत येत असतो. सलमानने त्याच्या आतापर्यंत ईदच्या दिवशी प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांच्या कमाईचा रेकॉर्ड ब्रेक केलेला आहे. 2010 मध्ये प्रदर्शित झालेल्या दबंग चित्रपटाने 14.50 कोटी, 2011 मध्ये बॉडीगार्ड 21.60 कोटी, 2012 मध्ये टायगर 32.93 कोटी, 2014 मध्ये किक 26.40 कोटी, 2015 मध्ये बजरंगी भाईजान 27.25 कोटी, 2016 मध्ये सुलतान 36.54 कोटी, 207 मध्ये ट्यूबलाईट 21.15 कोटी, 2018 मध्ये रेस 29.17 कोटी, या सर्व चित्रपटांना मागे टाकत भारत चित्रपटाने 42.30 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

सलमान खानच्या करिअरमधील सर्वात मोठी ओपनिंग फिल्म

सलमान खानच्या करिअरमधील सर्वात मोठा ओपनिंग चित्रपट प्रेम रतन धन पायो होता. चित्रपटाने 40.35 कोटी रुपयांची कमाई केली होती. सलमानच्या भारतनेही 42.30 कोटी रुपयांची कमाई केली आहे. यासह एक नवा रेकॉर्ड आपल्या नावावर नोंद केला आहे.

2019 मध्ये पहिल्या दिवशी भरघोस कमाई करणारा चित्रपट

वर्ष 2019 मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटांमध्ये भारत चित्रपटाने पहिल्याच दिवशी भरघोस कमाई केली आहे. याआधी कलंक चित्रपटाने पहिल्या दिवशी 21.60 कोटी रुपये, गलीबॉल 19.40 कोटी आणि टोटल धमालने 16.50 कोटी कमवले होते.

सर्वात मोठे प्रदर्शन

सलमान खानचा भारत चित्रपट 70 देशात 1300 पेक्षा अधिक स्क्रीन्सवर प्रदर्शित करण्याता आला होता. भारतात हा चित्रपट 4700 स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला. एकूण 6000 पेक्षा अधिक चित्रपटावर भारत चित्रपट प्रदर्शित झाला. चित्रपट गल्फ देश आणि युएई मध्ये एकूण 121 लोकेशन्सवर प्रदर्शित करण्यात आला. ऑस्ट्रेलियामध्ये 75 पेक्षा अधिक ठिकाणी हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *