"धनंजय, आता बास झालं" चित्रपट अभिनेत्रीची फेसबुक पोस्ट, आत्महत्येची धमकी

धनंजय सिंह नावाच्या व्यक्तीचे प्रोफाईल फोटो, पोस्ट यांचे स्क्रीनशॉट अपलोड करुन अभिनेत्री राणी चॅटर्जी हिने आत्महत्येचा इशारा दिला आहे.

"धनंजय, आता बास झालं" चित्रपट अभिनेत्रीची फेसबुक पोस्ट, आत्महत्येची धमकी

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येचं प्रकरण ताजं असतानाच एका अभिनेत्रीने आत्महत्येची धमकी दिली आहे. प्रख्यात भोजपुरी अभिनेत्री राणी चॅटर्जी हिने फेसबुक पोस्ट लिहून आपल्याला नैराश्य आल्याचं सांगितलं आहे. धनंजय सिंह नावाची व्यक्ती आपल्याला मानसिक त्रास देत असल्याचा आरोप राणीने केला आहे. (Bhojpuri Actress Rani Chatterjee Threatens to Suicide)

धनंजय सिंह नावाच्या व्यक्तीचे प्रोफाईल फोटो, पोस्ट यांचे स्क्रीनशॉट अपलोड करुन राणीने आत्महत्येचा इशारा दिला आहे. मुंबई पोलिसांना उद्देशून तिने आपण आत्महत्या केल्यास त्यास सर्वस्वी धनंजय सिंह जबाबदार असेल, असे म्हटले आहे.

काय आहे राणी चॅटर्जीची फेसबुक पोस्ट?

“डिप्रेशनमुळे मी आता खूप अस्वस्थ आहे. बर्‍याचदा मी कणखर आणि सकारात्मक राहण्याचा प्रयत्न केला, पण आता मला शक्य होत नाही. हा माणूस माझ्याबद्दल फेसबुकवर बर्‍याच वर्षांपासून वाईट-साईट लिहित आला आहे. मी बऱ्याच वेळा दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला. मी बर्‍याच लोकांशी बोलले, प्रत्येक जण म्हणाला की दुर्लक्ष करा, परंतु मीसुद्धा माणूस आहे. मी जाडी आहे, मी म्हातारी आहे, मी काही काम केलं, की हा इतकं घाणेरडं लिहितो. सर्व जण मला हे पाठवतात आणि म्हणतात की दुर्लक्ष कर. पण आता इग्नोर नाही होऊ शकत” असं राणी लिहिते.

“याबद्दल बर्‍याच वर्षांपासून मी खूप अस्वस्थ आहे. मी मानसिक ताणतणावातून जात आहे. मी जीव द्यावा, अशी बहुधा याची इच्छा आहे. यामुळे माझ्या वैयक्तिक आयुष्यात खूप तणाव आहे. मी मुंबई पोलिसांना विनंती करते, की जर मी वाकडे पाऊल उचलले, तर त्यासाठी जबाबदार धनंजय सिंह असेल.” असा थेट इशारा तिने दिला आहे.

“याबद्दल मी सायबर सेलमध्येही तक्रार केली होती, पण त्यांनी असे म्हटले होते की याने माझे नाव लिहिले नाही. परंतु मला माहित आहे की ते फक्त माझ्यासाठीच लिहिले जाते. कारण अशा पोस्टवर इतर लोक माझे नाव लिहितात आणि घाणेरड्या शिव्या देतात. आणि हा त्याचा आनंद घेतो. मी हतबल झाले आहे, आता माझ्यात हिम्मत नाही. एकतर मी आत्महत्या केली पाहिजे. कारण मी बर्‍याच वर्षांपासून खूप वाईट मानसिक अवस्थेतून जात आहे. आणखी सहन होत नाही. #सुसाईड” असे राणीने यात लिहिले आहे.

हेही वाचा : ‘तुझ्या दु:खाला जबाबदार कोण याची मला कल्पना’, सुशांत सिंह आत्महत्येप्रकरणी शेखर कपूर यांचाही जबाब होणार

(Bhojpuri Actress Rani Chatterjee Threatens to Suicide)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *