Bigg Boss Marathi-2 : बिग बॉसकडून पराग, रुपाली आणि नेहाची खरडपट्टी

बिग बॉसच्या भागात परागला महेश मांजरेकरांनी आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. तसेच त्याच्या गैरवर्तनामुळे त्याची चांगलीच खरडपट्टीही काढली. दरम्यान यामुळे तो घरातून बाहेर पडल्याच्या चर्चेला पुर्णविराम मिळाला आहे.

Bigg Boss Marathi-2 : बिग बॉसकडून पराग, रुपाली आणि नेहाची खरडपट्टी

मुंबई : कधी उत्तम जेवणामुळे, तर कधी रुपालीसोबत रोमान्समुळे बिग बॉस मराठीच्या सिझन 2 मध्ये चर्चेत आलेला एक चेहरा म्हणजे शेफ पराग कान्हेरे.. घरात एंट्री केल्यापासून सतत या ना त्या कारणाने चर्चेत असलेल्या परागची बिग बॉसने हकालपट्टी केल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली होती. मात्र आता या चर्चेला पुर्णविराम मिळाला आहे. कारण आज (29 जून) बिग बॉसच्या भागात परागला महेश मांजरेकरांनी आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. तसेच त्याच्या गैरवर्तनामुळे त्याची चांगलीच खरडपट्टीही काढली. दरम्यान यामुळे तो घरातून बाहेर पडल्याच्या चर्चेला पुर्णविराम मिळाला आहे.

‘टिकेल तो टिकेल’ या टास्कदरम्यान परागने रागाच्या भरात नेहाच्या कानशीलात लगावली होती. तसेच तिच्यासोबत गैरवर्तनही केले होते. यामुळे शिवानी सुर्वेप्रमाणे त्याचीही बिग बॉसच्या घरातून हकालपट्टी करण्यात येणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली होती.

बिग बॉस मराठीच्या घरात हिशोब पाप पुण्याचा हा नॉमिनेशन टास्क पार पडल्यानंतर आता घरात टिकेल तो टिकेल हा टास्क गेल्या आठवड्यात पार पडला. या टास्कमध्ये पराग हा सिंहासनावर बसलेला असताना मुद्दाम त्या ठिकाण तेल टाकून ठेवते. तर त्याचे वीणा ही त्याचे सरंक्षण करत असते. परागला सिंहासनावरुन उठवण्यासाठी नेहा परागला मेकअप करते. त्याच दरम्यान घरात अवघ्या काही दिवसांपूर्वी आलेल्या हिना आणि शिवमध्ये जोरदार वाद होतो. तर दुसरीकडे परागला सिंहासनावरुन खाली खेचण्यासाठी वैशाली, नेहा आणि अभिजीत जोरदार प्रयत्न करत असतात. या सर्व प्रयत्नात पराग नेहाच्या अंगावर पडतो. यानंतर बिग बॉस दोन्ही टीम हिंसक झाल्याने टिकेल तो टिकेल हा टास्क रद्द करतात.

परागच्या या वागणुकीमुळे त्याला बिग बॉसने घराचा आहेर दिल्याचे बोललं जात होते. तसेच अनेकांनी त्याने नेहासोबत केलेल्या गैरवर्तनामुळे बिग बॉस त्याला अडगळीच्या खोलीत टाकणार असल्याचेही बोललं जात होतं. मात्र आज (29 जून) झालेल्या भागात पराग हा नॉमिनेशन टास्क आधीच नॉमिनेट झाला होता. त्यामुळे बिग बॉसने त्याला आरोपीच्या पिंजऱ्यात ठेवलं होतं.

त्यानंतर शो चे सुत्रसंचालक महेश मांजरेकरांनी परागची चांगलीच खरडपट्टी काढली. तू नेहासोबत असे गैरवर्तन कसे करु शकतो, तू टास्कदरम्यान इतकी आक्रमकता का दाखवलीस असा सवालही महेश मांजरेकरांनी परागला विचारला. फक्त परागच नाही तर महेश मांजरेकरांनी नेहाला तिच्या वागण्याचा जाब विचारला.

दरम्यान बिग बॉसच्या घरातून शिवानी सुर्वे आणि अभिजीत बिचुकले बाहेर पडल्यानंतर परागचे नाव चांगलंच चर्चेत आले आहे. बिग बॉसच्या दिवसेंदिवस पराग आणि नेहाची भांडणे, वाद वाढतच असल्याने आज अखेर बिग बॉसने या दोघांचीही चांगलीच खरडपट्टी काढली आणि या दोघांना पुन्हा असे न करण्याचा सल्ला दिला. तसेच बिग बॉसने रुपाली भोसलेलाही नीट वाग असा सल्ला दिला आहे.

पाहा बिग बॉस मराठी-2 च्या सर्व बातम्या :

Bigg Boss Marathi-2 : पराग कान्हेरे बिग बॉसमधून आऊट?

Bigg Boss Marathi – 2 : बिग बॉसच्या घरातून बाहेर येताच रुपालीला थोबाडीत मारणार, आई संतप्त  

Bigg Boss Marathi-2 : शिवने नेहाच्या टीमची इस्त्री चोरली

Bigg Boss Marathi-2 : बिग बॉसच्या घरातील नवा कॅप्टन कोण?

Bigg Boss Marathi – 2 : महेश मांजरेकरांनी परागची लाज काढली

Bigg Boss Marathi – 2 : बिग बॉसच्या घरातून शिवानी सुर्वेला हाकलले

Bigg Boss Marathi : शिवानीने घातली वीणाला लाथ, दोघीही अपात्र, शिक्षा काय?

Bigg Boss Marathi – 2 : माझ्यामुळे मेघा धाडे ‘बिग बॉस’ जिंकली : शिवानी सुर्वे

Bigg Boss Marathi – 2 : ‘बिग बॉस मराठी-2’ मध्ये शिवानीच्या शूजची चर्चा