Bigg Boss Marathi-2 : पराग कान्हेरे बिग बॉसमधून आऊट?

'टिकेल तो टिकेल' या टास्कदरम्यान परागने रागाच्या भरात नेहाच्या कानशीलात लगावली होती. तसेच तिच्यासोबत गैरवर्तनही केले होते. यामुळे शिवानी सुर्वेप्रमाणे त्याचीही बिग बॉसच्या घरातून हकालपट्टी करण्यात येणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. 

Bigg Boss Marathi-2 : पराग कान्हेरे बिग बॉसमधून आऊट?
Follow us
| Updated on: Jun 28, 2019 | 8:33 AM

मुंबई : कधी उत्तम जेवणामुळे, तर कधी रुपालीसोबत रोमान्समुळे बिग बॉस मराठीच्या सिझन 2 मध्ये चर्चेत आलेला एक चेहरा म्हणजे शेफ पराग कान्हेरे… बिग बॉसच्या घरात एंट्री केल्यापासून पराग सतत या ना त्या कारणाने चर्चेत असतो. मात्र आता बिग बॉसच्या घरातून परागला बाहेरचा रस्ता दाखवण्यात येणार आहे. ‘टिकेल तो टिकेल’ या टास्कदरम्यान परागने रागाच्या भरात नेहाच्या कानशीलात लगावली होती. तसेच तिच्यासोबत गैरवर्तनही केले होते. यामुळे शिवानी सुर्वेप्रमाणे त्याचीही बिग बॉसच्या घरातून हकालपट्टी करण्यात येणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.

बिग बॉस मराठीच्या घरात हिशोब पाप पुण्याचा हा नॉमिनेशन टास्क पार पडल्यानंतर आता घरात टिकेल तो टिकेल हे कार्य रंगत आहे. या कार्यात दोन टीम करण्यात आल्या आहेत. यात घरातील अंगणात एक मोठे सिंहासन ठेवले आहे. बझर वाजल्यानंतर टीममधील एक सदस्य सिंहासनावर मुद्रावस्थेत बसणार आहे. त्याचे रक्षण करण्यासाठी त्याच्या बाजूला टीममधील एक सदस्य उभा राहणार आहे. दुसऱ्या टीमने बझर वाजण्यापूर्वी मुद्रावस्थेत बसलेल्या सदस्याला लवकरात लवकर हटवण्याचा प्रयत्न करायचा आहे. असा हा टास्क बिग बॉसच्या घरातील सदस्यांना देण्यात आला आहे.

त्यानुसार पराग हा सिंहासनावर बसलेला असताना मुद्दाम त्या ठिकाण तेल टाकून ठेवते. तर त्याचे वीणा ही त्याचे सरंक्षण करत असते. परागला सिंहासनावरुन उठवण्यासाठी नेहा परागला मेकअप करते. त्याच दरम्यान घरात अवघ्या काही दिवसांपूर्वी आलेल्या हिना आणि शिवमध्ये जोरदार वाद होतो. तर दुसरीकडे परागला सिंहासनावरुन खाली खेचण्यासाठी वैशाली, नेहा आणि अभिजीत जोरदार प्रयत्न करत असतात. या सर्व प्रयत्नात पराग नेहाच्या अंगावर पडतो.

यानंतर बिग बॉस दोन्ही टीम हिंसक झाल्याने टिकेल तो टिकेल हा टास्क रद्द करतात. तसेच या दरम्यान नेहा परागचा खासगी फोटोही हातात घेऊन उभी असते. त्यावेळी पराग नेहाला फोटो ठेव असे सांगतो. त्यावेळी तो तिच्या अगदी शेजारीच जाऊन उभा राहतो.  या सर्व प्रकारामुळे परागचे नेहासोबतचे वागणे कॅमेऱ्यात कैद होतं. दरम्यान नेहासोबत केलेलं गैरवर्तनामुळे त्याची बिग बॉसच्या घरातून हकालपट्टी करण्यात आल्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगली आहे.

पाहा बिग बॉस मराठी-2 च्या सर्व बातम्या :

Bigg Boss Marathi – 2 : बिग बॉसच्या घरातून बाहेर येताच रुपालीला थोबाडीत मारणार, आई संतप्त  

Bigg Boss Marathi-2 : शिवने नेहाच्या टीमची इस्त्री चोरली

Bigg Boss Marathi-2 : बिग बॉसच्या घरातील नवा कॅप्टन कोण?

Bigg Boss Marathi – 2 : महेश मांजरेकरांनी परागची लाज काढली

Bigg Boss Marathi – 2 : बिग बॉसच्या घरातून शिवानी सुर्वेला हाकलले

Bigg Boss Marathi : शिवानीने घातली वीणाला लाथ, दोघीही अपात्र, शिक्षा काय?

Bigg Boss Marathi – 2 : माझ्यामुळे मेघा धाडे ‘बिग बॉस’ जिंकली : शिवानी सुर्वे

Bigg Boss Marathi – 2 : ‘बिग बॉस मराठी-2’ मध्ये शिवानीच्या शूजची चर्चा

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.