Bigg Boss 14 | रुबीनाला धक्का, अभिनव आणि कविताच्या नात्याबद्दल घरात चर्चा

‘बिग बॉस 14’ (Bigg Boss 14) च्या कालच्या एपिसोडची सुरूवात ‘बचके रहना रे बाबा बचके रहना रे’ या गाण्याने झाली. बिग बॉसच्या घरातील सदस्यांना रात्रीच्या वेळी घरात वेगवेगळ्या सावल्या दिसत आहेत.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 13:50 PM, 25 Nov 2020
Bigg Boss 14

मुंबई : ‘बिग बॉस 14’ (Bigg Boss 14) च्या कालच्या एपिसोडची सुरूवात ‘बचके रहना रे बाबा बचके रहना रे’ या गाण्याने झाली. बिग बॉसच्या घरातील सदस्यांना रात्रीच्या वेळी घरात वेगवेगळ्या सावल्या दिसत आहेत. पवित्रा आणि एजाजला रात्रीच्या वेळी गॅस आपोआप सुरू झाल्याचे दिसले. घरातील सदस्य याबद्दलची चर्चा करताना दिसले. निक्की तांबोळी आणि कविता नॉमिनेशन टास्कच्या विषयावर बोलते वेळी कविता निक्कीला म्हणते की, एजाजला नॉमिनेशनमधून मी वाचवले आहे. याचा मला अजिबात पश्चाताप होत नाही. कारण एजाजने मी सांगितलेले ऐकले आहे. (Bigg Boss 14 |Rubina shocked due to abhinav and kavita relationship)

कविता आणि अलीमध्ये जोरदार भांडण
अली गोनी, अभिनव शुक्ला आणि रुबीना यांनी कॅप्टन कविताच्या नकळत फ्रीजमधून सॉफ्ट ड्रिंक चोरी करून बिग बॉसच्या घराच्या नियमांचे उल्लंघन केले. बिग बॉस कविताला म्हणतात घरातील ज्या सदस्यांनी नियमांचे उल्लंघन केले आहे, असे तुम्हाला वाटते अशा सदस्याचे वैयक्तिक सामान उचलून बिग बॉसच्या स्वाधीन करावे. जर तुम्ही या कामात यशस्वी झाली तर पुढच्या कॅप्टन दावेदार तुम्ही असाल अन्यथा तुम्ही कॅप्टनपदासाठी दावेदारी करू शकत नाहीत.

घरात ठेवण्यात आलेल्या बॉक्समध्ये कविता सर्वांत अगोदर अलीचे बुट टाकते यावरून कविता आणि अलीमध्ये जोरदार भांडणे होतात. भांडणामध्ये कविता अलीला म्हणते, मी तुझी बाप आहे. हे ऐकून अलीला राग अनावर होतो. आणि अली कविताच्या अंगावर धावून जातो, अली बिग बॅासच्या घरातील वस्तू इकडे तिकडे फेकून देतो. इतकेच करून अली थांबत नाहीतर पुढे तो कविताला धमकी देतो की, आता तू रात्री दोन मिनिटे झोपूनच दाखव, मी तुला सुखाने जगूच देणार नाही.

अभिनव आणि कविता फ्रेंड्स विथ बेनिफिट?
अलीने बिग बॉसने दिलेल्या बॉक्सला लाथ मारल्यामुळे कविताला राग येतो. कविता बिग बॉसला म्हणते की, अशा हिंसक वातावरणात मी घरात राहू शकत नाही. त्याचवेळी रुबीना कविताला बोलण्यासाठी जाते. त्यावेळी कविता रुबिनाला सांगते की, अभिनव आणि मी फ्रेंड्स विथ बेनिफिट होतो. तुला कदाचित अभिनवने कधी सांगितले नसेल. त्यावेळी रूबीना कविताला म्हणते मला माहिती आहे. मात्र, हे ऐकून घरातील इतर सदस्यांना धक्का बसतो. रूबीना अभिनवला म्हणते की, तु मली कधी सांगितले नाही की, तु आणि कविती फ्रेंड्स विथ बेनिफिट होतात. यावरून अभिनव आणि रूबीनामध्ये वाद होताना दिसतो.

जास्मीन, अली आणि अभिनव यांना शिक्षा
कविताला बिग बॉस गेम पुन्हा एकदा सुरू करण्यास सांगतात. त्यावेळी कविता अलीचे बुट बाहेर आणते. त्यावेळी पुन्हा एकदा कविता आणि अलीमध्ये भांडणे होतात. कविती अलीचे बुट बॉक्समध्ये टाकते, त्यावेळी जास्मीन बॉक्समधून ते काढते. कविताला बाहेर जाता येऊ नये म्हणून, अली दरवाजा बंद करतो आणि तेथेच बसतो. यामुळे बिग बॉस जास्मीन, अली आणि अभिनव यांना शिक्षा देतात.

संबंधित बातम्या : 

Bigg Boss 14 | प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी ‘बिग बॉस 14’च्या घरात ‘भूतं’ अवतरणार!

Bigg Boss 14 | बिग बॉसच्या घरातील सहा सदस्य नॉमिनेशन प्रक्रियेत

Bigg Boss 14 | एकता कपूरच्या उपस्थित मोठे धमाके, जान कुमार सानू ‘बिग बॉस’मधून ‘आऊट’!

(Bigg Boss 14 |Rubina shocked due to abhinav and kavita relationship)