Bigg Boss 14 | शेवटाची घाई की आणखी काही? टॉप 4 स्पर्धकांमधून जास्मीन भसीनही ‘बेघर’

आता ‘बिग बॉस 14’मधील घरातले चित्र आता पूर्णपणे उलटे झाले आहे. सलमान खानच्या महाअंतिम सप्ताहाच्या घोषणेनंतर या आठवड्यात अनेक धक्कादायक बदल ‘बिग बॉस’च्या घरात दिसून आले आहेत.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 18:21 PM, 2 Dec 2020
jasmin bigg boss 14

मुंबई : ‘बिग बॉस 14’मधील घरातले चित्र आता पूर्णपणे उलटे झाले आहे. सलमान खानच्या महाअंतिम सप्ताहाच्या घोषणेनंतर या आठवड्यात अनेक धक्कादायक बदल ‘बिग बॉस’च्या घरात दिसून आले आहेत. गेल्या एपिसोडमध्ये ‘बिग बॉस’ने दिलेल्या टास्कमध्ये जास्मीन भसीन आणि अली गोनीची जोडी तुटलेली आपल्याला बघायला मिळाली. अली गोनी घरातून बेघर झाला आहे. पण सोशल मीडिया हँडल खबरीच्या मते, अलीने आपल्या बेस्ट फ्रेंडमुळे हा कार्यक्रम सोडला. तर, आता जास्मीनही बेघर झाल्याचे कळते आहे. (Bigg boss 14 Top 4 contestants Jasmine Bhasin also Out?)

‘बिग बॉस’च्या नव्या प्रोमोमध्ये जस्मीन भसीन दिसली नाही. मात्र, वैद्यकीय कारण किंवा दुसऱ्या कुठल्या कारणामुळे जास्मीनला वेगळे ठेवलेले असू शकते. पण जर जास्मीनला खरोखर बिग बॉसच्या घरातून बेघर करण्यात आले असेल तर, चाहत्यांसाठी हा सर्वात मोठा धक्का असणार आहे. बिग बॉसच्या घरातून जास्मीन भसीनला बेघर करण्यात आले असेल तर, तिचा जवळचा मित्र अली गोनी यालाही मोठा धक्का बसू शकतो, कारण अली गोनी जास्मीनसाठी बेघर होण्याचा निर्णय घेतो.
‘इम्युनिटी स्टोन’ मिळवण्यासाठी बिग बॉसच्या घरातील सदस्यांनी आपआपली रहस्ये उघड केली होती. मात्र प्रोमोमध्ये इम्युनिटी स्टोन एजाज खानला मिळाला.
गेल्या आठवड्यातील एकता कपूरने ‘इम्युनिटी स्टोन’ रूबीनाला दिला होता. ज्याच्या सहाय्याने रूबीना एकदा नॉमिनेशन प्रक्रियेतून सुरक्षित राहु शकत होती. परंतु रुबीनाने अद्याप इम्युनिटी स्टोन वापरला नाही. बिग बॉसने रुबीनाला इम्युनिटी स्टोनचा वापर करण्याविषयी विचारले होते. मात्र, तिने इम्युनिटी स्टोन वापरण्यास नकार दिला होता.
अलीने बिग बॉसने दिलेल्या बॉक्सला लाथ मारल्यामुळे कविताला राग आला होता. कविता बिग बॉसला म्हणते की, अशा हिंसक वातावरणात मी घरात राहू शकत नाही. त्याचवेळी रुबीना कविताला बोलण्यासाठी जाते. त्यावेळी कविता रुबिनाला सांगते की, अभिनव आणि मी फ्रेंड्स विथ बेनिफिट होतो. तुला कदाचित अभिनवने कधी सांगितले नसेल. त्यावेळी रूबीना कविताला म्हणते मला माहिती आहे. मात्र, हे ऐकून घरातील इतर सदस्यांना धक्का बसला होता. रूबीना अभिनवला म्हणते की, तु मला कधी सांगितले नाही की, तु आणि कविती फ्रेंड्स विथ बेनिफिट होतात. यावरून अभिनव आणि रूबीनामध्ये वाद झाला होता.

संबंधित बातम्या :

Bigg Boss 14 | जास्मीन, अली, रूबीना की अभिनव? ‘बिग बॉस’मधून एक सदस्य बेघर होणार!

Bigg Boss 14 | प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी ‘बिग बॉस 14’च्या घरात ‘भूतं’ अवतरणार!

(Bigg boss 14 Top 4 contestants Jasmine Bhasin also Out?)