मुंबई: बिग बॉसचा सोळावा सिझन अवघ्या काही दिवसांत संपुष्टात येणार आहे. हा शो ग्रँड फिनालेच्या जवळ येऊन पोहोचला आहे. नुकतंच बिग बॉसच्या घरातून निमृत कौर आहलुवालियाला बाहेर पडावं लागलं. तिच्या एलिमिनेशननंतर बिग बॉसला टॉप 5 स्पर्धक मिळाले आहेत. आता अर्चना गौतम, शिव ठाकरे, प्रियांका चहर चौधरी, शालीन भनोट आणि एमसी स्टॅन यांच्यामध्ये ट्रॉफी जिंकण्यासाठी चुरस रंगली आहे. सोशल मीडिया ट्रेंडनुसार प्रियांका आणि शिव यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. या दोघांपैकी कोणीतरी एक बिग बॉसची ट्रॉफी आपल्या नावे करणार असल्याचं म्हटलं जातंय. या चर्चांदरम्यान आता टीव्ही अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जी हिने विजेत्याच्या नावाचा खुलासा केला आहे.