Bigg Boss Marathi-2 : अभिजीत बिचुकलेंची नवी स्ट्रॅटेजी काय आहे?

सुरेखा पुणेकर यांनी कार्यक्रमाचे होस्ट महेश मांजरेकर यांच्या समोर बिचुकले कुठे चुकतात, शिवीगाळ करतात यावर आक्षेप घेतला आणि त्यांना खडसावलं. त्यानंतर निश्चितच अभिजीत बिचुकलेंच्या मनात सुरेखा पुणेकर यांच्याबाबत द्वेश निर्माण झाला.

Bigg Boss Marathi-2 : अभिजीत बिचुकलेंची नवी स्ट्रॅटेजी काय आहे?

मुंबई : बिग बॉस मराठी-2 च्या घरामध्ये कोण कधी कुणाच्या बाजूने बोलेल, कोण पाठ फिरतच वार करेल, कोणता सदस्य कुणाला भडकवायचा प्रयत्न करेल हे कळणं अवघड आहे. आता हेच बघा ना, अभिजीत बिचुकले हे सुरेखा पुणेकर यांना त्यांची आई मानतात. त्या माझ्या आईच्या जागी आहेत, असं बिचुकले अनेकदा सांगत फिरतात. मात्र, गेल्या आठवड्यामध्ये झालेल्या विकेंडचा डावमध्ये सुरेखा पुणेकर यांनी अभिजीत बिचुकले यांची चांगलीच शाळा घेतली.

गेल्या आठवड्यात शाळेवर एक टास्क झाला. यावेळी काही स्पर्धक हे विद्यार्थी झाले होते तर काही शिक्षक. यावेळी शिक्षकाच्या रुपात असलेल्या अभिजीत बिचुकले यांनी अर्वाच्य भाषेचा वापर करत शिवीगाळ केला. ते कुणालाच ऐकायला तयार नव्हते, सुरेखा पुणेकर यांनीही त्यांना शांत राहण्यास सांगितलं, तरीही बिचुकले शिवीगीळ करत होते. सुरेखा पुणेकर यांनी कार्यक्रमाचे होस्ट महेश मांजरेकर यांच्या समोर बिचुकले कुठे चुकतात, शिवीगाळ करतात यावर आक्षेप घेतला आणि त्यांना खडसावलं.

त्यानंतर निश्चितच अभिजीत बिचुकलेंच्या मनात सुरेखा पुणेकर यांच्याबाबत द्वेश निर्माण झाला. आजच्या भागात अभिजीत बिचुकले हे सुरेखा पुणेकरांबद्दल नेहा शितोळेला काही गोष्टी सांगणार आहेत. “सुरेखा ताईंना मी आधीपासून ओळखतो. त्या वेगळ्याच मानसिकतेत आहेत आणि आपला शो फ्लॉप करण्याच त्यांच्या डोक्यात आहे. त्या माझ्यासमोर बोलल्या ते किंवा त्या मला उकस्वत होत्या, की यावर माझ्याकडून काही विधान घेऊन पुढे त्यांना ट्वीस्ट करायचं होत मला माहिती नाही. तसेच, काल झालेल्या प्रकारावरून रुपालीने माफी मागितली आणि मी देखील माफी मागितली आणि हे होत असताना त्या तिथे होत्या आणि त्या म्हणाल्या ही पहिल्यापासून मला नको होती आणि नको आहे”, असं अभिजीत बिचुकले यांनी सुरेखा पुणेकर यांच्याबद्दल नेहाला सांगितलं. यावर सुरेका ताईंना कोण नको आहे, असं नेहाने विचारलं. त्यावर तू नको आहेस, असं बिचुकले यांनी सांगितलं.

अभिजीत बिचुकलेंच्या या विधानावर नेहा विश्वास ठेवेल की नाही हे तर आजच्या भागात कळेल. मात्र, जदर नेहाने यावर विश्वास ठेवला तर नेहा आणि सुरेखा पुणेकरांमध्ये जुंपणार आणि जर नेहाने हे सर्व सुरेखा ताईंना सांगतिलं तर मात्र बिचुकलेंचं काही खरं नाही.

पाहा बिग बॉस मराठी-2 च्या सर्व बातम्या :

Bigg Boss Marathi-2 : बिग बॉसच्या घरातील नवा कॅप्टन कोण?

Bigg Boss Marathi – 2 : महेश मांजरेकरांनी परागची लाज काढली

Bigg Boss Marathi – 2 : बिग बॉसच्या घरातून शिवानी सुर्वेला हाकलले

Bigg Boss Marathi : शिवानीने घातली वीणाला लाथ, दोघीही अपात्र, शिक्षा काय?

Bigg Boss Marathi – 2 : माझ्यामुळे मेघा धाडे ‘बिग बॉस’ जिंकली : शिवानी सुर्वे

Bigg Boss Marathi – 2 : ‘बिग बॉस मराठी-2’ मध्ये शिवानीच्या शूजची चर्चा