Bigg Boss Marathi 2 : अभिजीत बिचुकले कोठडीतच, ‘बिग बॉस’ची दारं बंद?

बिग बॉस मराठीतील स्पर्धक अभिजीत बिचुकलेला आता बिग बॉसची दारं बंद होण्याची शक्यता आहे. कारण खंडणीप्रकरणी कोठडीत असलेल्या बिचुकलेला जामीन देण्यास सातारा कोर्टाने नकार दिला आहे.

Bigg Boss Marathi 2 : अभिजीत बिचुकले कोठडीतच, 'बिग बॉस'ची दारं बंद?
Follow us
| Updated on: Jun 28, 2019 | 6:48 PM

सातारा: बिग बॉस मराठीतील स्पर्धक अभिजीत बिचुकलेला आता बिग बॉसची दारं बंद होण्याची शक्यता आहे. कारण खंडणीप्रकरणी कोठडीत असलेल्या बिचुकलेला जामीन देण्यास सातारा कोर्टाने नकार दिला आहे. त्यामुळे अभिजीत बिचुकलेला अद्याप कोठडीतच राहावं लागणार आहे. खंडणी प्रकरणात अभिजीत बिचुकले 7 वर्षापासून फरार आहे. त्यामुळे आता जर जामीन दिला आणि तो मुंबईसारख्या ठिकाणी गेला तर पुन्हा शोधणं कठीण होईल, असा युक्तीवाद सरकारी वकिलांनी केला. तो ग्राह्य मानत कोर्टाने बिचुकलेचा जामीन फेटाळला.

खंडणी प्रकरणात सातारा जिल्हा सत्र न्यायालयात आज सुनावणी झाली. यावेळी अभिजीत बिचुकलेला जामीन मिळावा अशी मागणी त्यांच्या वकिलांनी केली. मात्र कोर्टाने त्याला स्पष्ट नकार दिला. अभिजीत बिचुकले गेल्या पाच दिवसांपासून कोल्हापूरच्या कळंबा कारागृहात आहे.

वाचा : अभिजीत बिचुकलेच्या जागी बिग बॉसमध्ये जाणार का? शितली म्हणते…

अभिजीत बिचुकलेला चेक बाऊन्स प्रकरणी शुक्रवारी 21 जून रोजी सातारा पोलिसांनी मुंबईत येऊन अटक केली होती. बिग बॉसच्या सेटवरुन अभिजीत बिचुकलेला अटक करण्यात आली. त्यानंतर याप्रकरणी शनिवारी (22 जून) सातारा जिल्हा न्यायलयात हजर केले होते. त्याला चेक बाऊन्स प्रकरणी सातारा जिल्हा न्यायलयाने जामीन मंजूर केला होता. मात्र खंडणी प्रकरणी त्याचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळत, त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली.

त्यानंतर 24 जून रोजी या प्रकरणी सातारा जिल्हा सत्र न्यायलयाने सुनावणी केली. यावेळी न्यायधीशांनी बिचुकलेचा खंडणी प्रकरणातील जामीन अर्ज फेटाळला. त्यामुळे बिचुकलेला 27 जूनपर्यंत न्यायलयीन कोठडीत राहावे लागणार असल्याचे कोर्टाने म्हटलं होतं. मग बिचुकलेंच्या जामीन अर्जावर आज 28 जून रोजी सुनावणी झाली, मात्र आजही जामीन मिळाला नाही.

तक्रार मागे

दरम्यान अभिजीत बिचुकले विरोधात खंडणीची तक्रार करणाऱ्या फिरोज पठाण यांनी तक्रार मागे घेतली होती. त्यानंतर बिग बॉसच्या घरात पुन्हा एकदा जाण्याचा त्याचा मार्ग मोकळा झाला होता. पण कोर्टाने अद्याप जामीनच मंजूर केलेला नाही.

अभिजीत विरोधात दोन तक्रारी 

बिग बॉस मराठी सिझन 2 मधून अल्पावधीत प्रसिद्धी मिळालेल्या अभिजीत बिचुकलेविरोधात दोन तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. यातील एक तक्रार चेक बाऊन्स प्रकरणातील होती. वकील संदीप सकपाळ यांनी चेक बाऊन्स प्रकरणी तक्रार दाखल केली होती. तर दुसरी तक्रार खंडणी प्रकरणी असून ती फिरोज पठाण यांनी दाखल केली होती.

बिग बॉसची टीम साताऱ्यात 

यंदाच्या बिग बॉस मराठी सिझन 2 मध्ये अल्पावधीतच प्रसिद्धी मिळालेला एक चेहरा म्हणजे अभिजीत बिचुकले (Abhijeet Bichukale).. वादग्रस्त वक्तव्य करणे, टास्क खेळताना नियमांच्या विरुद्ध वागणे, घरातील महिला सदस्यांसोबत फर्ल्ट करणे यामुळे बिचुकले अनेकदा चर्चेत आले आहेत. यामुळे बिचुकले शो मध्ये असताना शो चा टीआरपी चांगलाच वाढला होता. त्यामुळे शोच्या टीआरपीसाठी बिग बॉसची टीम त्यांना परत आणण्यासाठी आटोकाट प्रयत्न करते आहे. बिचुकलेंना अटक झाल्यापासून गेल्या चार दिवसांपासून बिग बॉस टीम सातारा मुक्कामी आहे. त्यामुळे बिचुकलेंची कोठडीतून सुटका झाल्यानंत त्यांना थेट बिग बॉसच्या घरात आणलं जाणार असल्याची चर्चा आता सोशल मीडियावर रंगली आहे.

संबंधित बातम्या 

Bigg Boss Marathi 2 : अभिजीत बिचुकलेच्या जामीनासाठी ‘तारीख पे तारीख’  

अभिजित बिचुकलेला बिग बाॅसमधून बाहेर आणणाऱ्या तक्रारदाराशी बातचीत  

Bigg Boss Marathi 2 : अभिजीत बिचुकले विरोधातील तक्रार मागे  

Bigg Boss Marathi 2 : अभिजीत बिचुकलेचा जामीन नामंजूर, कोर्टात काय घडलं? 

Non Stop LIVE Update
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.