Top 5 News : दिव्या अग्रवाल बिग बॉस ओटीटी विनर; सोनू सूदवर 20 कोटींच्या करचोरीचा आरोप,मनोरंजन विश्वातील मोठ्या घडामोडी

मनोरंजन विश्वात कधी काय होईल हे कोणीच सांगू शकत नाही. मनोरंजनाच्या जगात दररोज काही ना काही घडते आणि आम्ही त्याशी संबंधित सर्व बातम्या तुम्हाला वेळेवर देत राहतो.

Top 5 News : दिव्या अग्रवाल बिग बॉस ओटीटी विनर; सोनू सूदवर 20 कोटींच्या करचोरीचा आरोप,मनोरंजन विश्वातील मोठ्या घडामोडी
दिव्या अग्रवाल सोनू सूद
Follow us
| Updated on: Sep 19, 2021 | 8:22 AM

मनोरंजन विश्वात कधी काय होईल हे कोणीच सांगू शकत नाही. मनोरंजनाच्या जगात दररोज काही ना काही घडते आणि आम्ही त्याशी संबंधित सर्व बातम्या तुम्हाला वेळेवर देत राहतो. शनिवार अर्थात 18 सप्टेंबर हा दिवस मनोरंजन क्षेत्रातही महत्त्वाचा होता. जिथे एकीकडे, बिग बॉस OTT मध्ये दिव्या अग्रवाल विजयी झाली. सोनू सूदच्या मालमत्तेची चौकशी केल्यानंतर प्राप्तिकर विभागानं त्याच्यावर 20 कोटी रुपयांच्या करचोरीचे आरोप केले आहेत. बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंतच्या सगळ्या मोठ्या बातम्या 18 सप्टेंबरच्या एंटरटेनमेंट टॉप 5 बातम्या जाणून घेऊया.

कंगणा रणौतची ठाकरे सरकारवर टीका

बॉलिवूड अभिनेत्री कंगणा रणौत सध्या तिच्या रिलीज झालेल्या ‘थलायवी’ चित्रपटामुळे खूप चर्चेत आहे. कंगणा रणौतच्या या चित्रपटाला तमिळ आणि तेलगू भाषांमध्ये चित्रपटगृहे मिळाली. पण, कंगणाच्या चित्रपटाला हिंदी भाषेत एकही चित्रपटगृह मिळालेलं नाही. यामुळं कंगणा रणौतला राग अावर झाला. मुंबईतील सिनेमागृहे न उघडल्याबद्दल कंगणाने पुन्हा एकदा महाराष्ट्र सरकारला फटकारले आहे.

कंगणा रणौत सातत्यानं महाराष्ट्र सरकार विरोधात आक्रमक भूमिका घेत आहे. कंगणाच्या बेधडक स्वभावामुळं सोशल मीडियावर लाखो चाहते तिला फॉलो करतात. तिने तिच्या इन्स्टा हँडलवर महाराष्ट्र सरकार आणि उद्धव ठाकरेंवर राग व्यक्त करणारी पोस्ट टाकल्यानंतर तिच्या चाहत्यांनी देखील अेक कमेंट्स केल्या. ‘चित्रपटसृष्टीतून नाट्यसंस्कृती पूर्णपणे नष्ट होईपर्यंत महाराष्ट्र सरकार चित्रपटगृहे बंद ठेवणार आहे, अशी टीका कंगणांनं केली होती.

दिव्या अग्रवाल बिग बॉस ओटीटी ट्रॉफी विजेती

बिग बॉस ओटीटीला विजेता मिळाला आहे. दिव्या अग्रवालने या शोचे विजेतेपद मिळवलं आहे. दिव्यासह टॉप पाचमध्ये शमिता शेट्टी, राकेश बापट, निशांत भट आणि प्रतीक सहजपाल यांनी प्रवेश मिळवला होता. दिव्यानं सर्वांना पराभूत करत बिग बॉस ओटीटी ट्रॉफी मिळवली. याशिवाय तिला र 25 लाख रुपये देखील मिळाले आहेत. यासोबतच दिव्या आता सलमान खानच्या शो बिग बॉस 15 मध्ये दिसणार आहे.

सलमान खानचा बिग बॉस 15 लवकरच सुरू

बिग बॉसच्या (Big Boss) चाहत्यांची प्रतीक्षा आता संपली आहे. सलमान खानचा बिग बॉस 15 (Big Boss 15) 2 ऑक्टोबरपासून कलर्स टीव्हीवर सुरू होत आहे. बिग बॉस ओटीटी विजेता दिव्या अग्रवाल, प्रतीक सहजपालसह मनोरंजन क्षेत्रातील अनेक नामांकित कलाकारांना देशातील सर्वात मोठ्या रिअॅलिटी शोमध्ये सहभागी होण्याची संधी मिळेल. कलर्स टीव्हीने शेअर केलेल्या प्रोमोमध्ये ऑन एअर डेट समजते. सलमान खानचे चाहते 2 ऑक्टोबरची वाट पाहण्यात खूप उत्सुक आहेत.

बिग बॉसचा एक प्रोमो देखील रिलीज झाला आहे. “हर सीजन मे होता है एक नाय ट्विस्ट !” अशी टॅग लाईन देण्यात आली आहे. #Bigg Boss चा हा सीझन स्पर्धकांसाठी नवीन समस्या घेऊन येईल. प्रवास त्यांचा असेल, पण मनोरंजन आमचे आहे. तर तुम्ही #BB15 च्या प्रीमियर रात्रीसाठी तयार आहात का?, असं प्रेक्षकांना प्रोमोमधून विचारण्यात आलं आहे. बिग बॉसचा प्रीमियर 2 ऑक्टोबर रोजी रात्री 9:30 वाजता कलर्सवर वाहिनीवर आहे.

आरोपपत्र दाखल होताच राज कुंद्रा न्यायालयात

अश्लिल चित्रपट बनवणे आणि विक्री केल्याप्रकरणी उद्योजक राज कुंद्राविरोधात (Raj Kundra) मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) आरोपपत्र दाखल केले आहे. पोलिसांनी आरोपपत्र दाखल करताच अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याने मुंबईच्या दंडाधिकारी न्यायालयात धाव घेतली आहे. राज कुंद्रा यांनी दंडाधिकारी न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला आहे. कुंद्रानं न्यायालयाला जामीन अर्ज मंजूर करण्याची विनंती केली आहे कारण आता मुंबई पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले आहे, त्यामुळे न्यायालयानं त्याला जामीन द्यावा, अशी विनंती तिनं केली आहे.

मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने पोर्नोग्राफी प्रकरणात दोषी असताना राज कुंद्रासह चार जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे. आरोपपत्र दाखल झाल्यानंतर राज कुंद्रा यांनी आपला जामीन अर्ज दाखल करताना आरोपपत्र दाखल झाल्याचा दाखला दिला. आरोपपत्र दाखल झाल्यानं चौकशी पूर्ण झाल्यानं आता जामिनावर मुक्तता करावी, असं कुंद्रानं म्हटलं आहे.

सोनू सूदवर 20 कोटी रुपयांच्या करचोरीचा आरोप

आयकर विभाग (IT Department ) अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) च्या मुंबई आणि लखनऊ येथील इन्फ्रास्ट्रक्चर ग्रुपच्या काही ठिकाणी आयकर पथकाने छापे टाकले आहेत. मुंबई, लखनऊ, कानपूर, जयपूर, दिल्ली आणि गुरुग्राम येथील 28 ठिकाणी एकाच वेळी शोध मोहीम सुरू होती. आयकर विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिनेता सोनू सूद आणि त्याच्या जवळच्या व्यावसायिकांच्या ठिकाणांच्या शोधादरम्यान करचोरीशी संबंधित कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत.

सोनू सूदने काळ्या पैशाचा मोठा भाग बनावट कंपन्यांना पाठवला असल्याचं तपासादरम्यान आढळल्याची माहिती आहे. आतापर्यंत एकूण 20 बनावट व्यवहारांची माहिती मिळाली आहे. कर चुकवण्यासाठी या बनावट कंपन्यांच्या माध्यमातून पैसे वळवले गेल्याचं त्यावरुन सिद्ध होतं. सोनू सूदविरोधात रोख रकमेऐवजी धनादेश जारी केल्याचे पुरावेही मिळाले आहेत. ते पैसे बनावट कंपन्यांकडून कर्ज घेऊन गुंतवणूक आणि जमीन खरेदीसाठीही वापरले गेले. सोनू सूदने या प्रकरणात 20 कोटींची करचोरी केल्याचा आरोप आयकर विभागानं केला आहे.

इतर बातम्या:

बिग बॉस होस्ट करण्यासाठी सलमाननं किती पैसे घेतले असतील? एका बाजूला सलमान, दुसऱ्या बाजूला 350 लँड रोव्हर

Bigg Boss OTT : दिव्या अग्रवाल ठरली बिग बॉस ओटीटीची विजेती, ट्रॉफीसह 25 लाख रुपये जिंकले

Bigg boss ott winner divya agarwal to sonu sood evaded over 20 crore in taxes read all big entertainment news in Marathi

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.