दिशा पटाणी : 500 रुपये घेऊन मुंबईत आली, आज स्वतःसाठी 5 कोटींचं घर घेतलं

अभिनेता सलमान खानच्या भारत सिनेमातही तिने भूमिका साकारली आहे. बॉक्स ऑफिसवर हिट ठरलेल्या या सिनेमाचं यश सध्या दिशा साजरी करत आहे. बॉलिवूडमध्ये करिअर करण्यासाठी मुंबईत आलेली दिशा पटाणी आज एक सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून पुढे येत आहे.

दिशा पटाणी : 500 रुपये घेऊन मुंबईत आली, आज स्वतःसाठी 5 कोटींचं घर घेतलं
Follow us
| Updated on: Jun 12, 2019 | 7:33 PM

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटाणी 26 वा जन्मदिन साजरा करत आहे. कधी टायगर श्रॉफ, तर कधी युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासोबत दिशा पटाणीचं नाव जोडलं जातं. तिच्या हटके स्टाईलमुळे ती नेहमीच चर्चेत असते. अभिनेता सलमान खानच्या भारत सिनेमातही तिने भूमिका साकारली आहे. बॉक्स ऑफिसवर हिट ठरलेल्या या सिनेमाचं यश सध्या दिशा साजरी करत आहे. बॉलिवूडमध्ये करिअर करण्यासाठी मुंबईत आलेली दिशा पटाणी आज एक सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून पुढे येत आहे.

दिशाने बॉलिवूडमध्ये टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या बायोपिकमधून पदार्पण केलं. सुशांत सिंह राजपूतसोबत तिने या सिनेमात धोनीच्या पहिल्या गर्लफ्रेंडची भूमिका साकारली आणि चाहत्यांची मनं जिंकली. यापूर्वी तिने तेलगू सिनेमा लोफरमध्येही काम केलं होतं. यानंतर एका व्हिडीओ अल्बममधून तिने बॉलिवूडची कारकीर्द सुरु केली. तिचा ‘कुंग फू पाडा’ हा सिनेमाही चांगलाच गाजला होता.

दिशाने तिच्या करिअरविषयी एका मुलाखतीत सांगितलं होतं. ड्रीम करिअरसाठी शिक्षण अर्ध्यावरच सोडावं लागल्याचं ती म्हणाली होती. मुंबईला फक्त 500 रुपये घेऊन आली होती. एकटी राहून काम करत होते, पण कुटुंबीयांकडून कधीही मदत मागितली नाही, असं तिने सांगितलं होतं.

आधी डिनर, आता एकाच दिवशी बर्थ डे, आदित्य ठाकरे-दिशा पटाणीचा योगायोग

दिशा पटाणी एक चांगली डान्सरही आहे. रणबीर कपूर हा दिशाचा क्रश होता. रणबीरचे पोस्टर लागलेल्या रस्त्यांहूनच दिशा तिच्या स्कुटीहून शाळेत जायची. या पोस्टरकडे पाहत स्कुटी चालवल्यामुळे अनेकदा आपला अपघात झाल्याचंही तिने सांगितलं आहे.

टायगर श्रॉफपूर्वी टीव्ही अभिनेता पार्थ समथानला दिशा डेट करत होती, असं बोललं जातं. दोघे एक वर्षापेक्षाही जास्त रिलेशनशीपमध्ये असल्याचं बोललं जातं. पण तेव्हा ती बॉलिवूडशी जोडलेली नव्हती. तर पार्थ टीव्ही इंडस्ट्रीमध्ये जास्त प्रसिद्ध होता. नंतर दोघेही वेगळे झाले.

अभिनेत्री होण्याचं स्वप्न घेऊन मुंबईत आलेल्या दिशाने तिच्या प्रत्येक सिनेमात भूमिकेला न्याय दिला. एमएस धोनी अनटोल्ड स्टोरीमध्ये तिची छोटीशी असलेली भूमिका चाहत्यांना प्रचंड भावली. यानंतर तिला काम मिळत गेलं आणि ती यशाच्या शिखरावर चढत राहिली. मुंबईत फक्त 500 रुपये घेऊन आलेल्या दिशाने स्वतःसाठी घरही घेतलं. वांद्रेमध्ये तिने 2017 मध्ये घर घेऊन स्वतःलाच गिफ्ट दिलं, ज्याची किंमत 5 कोटी रुपये आहे.

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.