कंगनानंतर फॅशन डिझायनर मनिष मल्होत्रा रडारवर, अनधिकृत बांधकामासाठी बीएमसीची नोटीस

मनिष मल्होत्राच्या बंगल्यातील बांधकामांवर आक्षेप नोंदवत महापालिकेने नोटीस पाठवली आहे, उत्तर देण्यासाठी सात दिवसांचा अवधी देण्यात आला आहे.

कंगनानंतर फॅशन डिझायनर मनिष मल्होत्रा रडारवर, अनधिकृत बांधकामासाठी बीएमसीची नोटीस
Follow us
| Updated on: Sep 10, 2020 | 11:36 AM

मुंबई : अभिनेत्री कंगना रनौतच्या पाली हिलमधील ऑफिसवर कारवाई केल्यानंतर आता बॉलिवूडचा फॅशन डिझायनर मनिष मल्होत्रा मुंबई महापालिकेच्या रडारवर आहे. आपली रहिवासी जागा बेकायदेशीरपणे व्यावसायिक मालमत्तेत रुपांतरित केल्याबद्दल बीएमसीने मल्होत्राला नोटीस बजावली आहे. (BMC issued show cause notice to fashion designer Manish Malhotra for allegedly making unauthorized alterations at office building)

पाली हिल भागात कंगनाच्या कार्यालयापासून काही अंतरावर असलेल्या मनिष मल्होत्राच्या बंगल्यातील बांधकामांवर महापालिकेने आक्षेप नोंदवला आहे. मनिषला ‘कारणे दाखवा’ नोटिशीला उत्तर देण्यासाठी सात दिवसांचा अवधी देण्यात आला आहे. त्याच्या बंगल्याबाहेर पोलीस बंदोबस्तही वाढवण्यात आला आहे.

बंगल्यातील व्यवस्थापन कार्यालयाच्या पहिल्या मजल्यावर विभाजन, केबिनची उभारणी, मूळ रचनेत अनधिकृत फेरफार किंवा शेड तयार करुन बांधकामात अनधिकृत भर घालणे, अशा बदलांकडे महापालिकेने लक्ष वेधले आहे.

व्यावसायिक वापरासाठी बीएमसीची परवानगी आवश्यक असते आणि त्यासाठी काही रक्कम भरणेही अनिवार्य असते, परंतु मनिष मल्होत्राने ना बीएमसीकडून कोणती परवानगी घेतली, ना कुठलेही पैसे जमा केले.

एमएमसी कायद्याच्या कलम 342 आणि 5 345 अन्वये मनिष मल्होत्राला नोटीस पाठवली आहे. बेकायदा बांधकामे का पाडली जाऊ नये, यावरील त्याचे स्पष्टीकरण असमाधानकारक असल्यास कलम 475 अ अन्वये खटला चालवण्यास तो पात्र असल्याचे नोटिशीत लिहिले आहे.

कोण आहे मनिष मल्होत्रा?

  • बॉलिवूड, हॉलिवूड आणि टेलिव्हिजन विश्वातील प्रसिद्ध कॉस्च्युम डिझायनर आणि स्टायलिस्ट
  • 1990 पासून फॅशन डिझायनर म्हणून करिअरला सुरुवात
  • बॉलिवूडमधील आघाडीच्या कलाकारांचा स्टायलिस्ट 
  • 1998 मध्ये मॉडेलिंगही केले
  • 2005 मध्ये “मनिष मल्होत्रा” या नावाने स्वतःचा ब्रँड सुरु, मुंबई आणि दिल्लीत स्टोअर
  • फिल्मफेअरसह अनेक पुरस्कार, आंतरराष्ट्रीय स्तरावरही सन्मान

कंगना रनौतच्या मुंबईतील कार्यालयावर काल महापालिकेचा हातोडा पडला. कंगनाच्या याचिकेनंतर हायकोर्टाने पाडकामाला स्थगिती देण्याचे आदेश दिले. तसेच पालिकेला आपले म्हणणे मांडण्याच्या सूचना दिल्या आहेत.

संबंधित बातम्या :

“हा माझा सर्वात आवडता फोटो, यात माझ्या आयुष्याला मिळालेली कलाटणी”, कंगना रनौतचं नवं ट्वीट

उद्धव ठाकरे, आज माझं घर तोडलं, उद्या तुझा गर्व तुटेल, कंगनाकडून मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख

बीएमसीची ऑफिसवर कारवाई, कंगनाकडून बाबर आणि पाकिस्तानशी तुलना

(BMC issued show cause notice to fashion designer Manish Malhotra for allegedly making unauthorized alterations at office building)

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.