बॉबी देओलचं या अभिनेत्रीसोबत होतं अफेअर, वडिलांमुळे मोडलं होतं लग्न

बॉलिवूडचा अभिनेता बॉबी देओल आश्रम या वेब सीरीजमध्ये पुन्हा एकदा चांगलाच चर्चेत आला होता. कोणत्या सिनेमात त्याला इतकी प्रसिद्धी मिळाली नाही जितकी या वेब सीरीजमुळे मिळाली आहे. पण बॉबी देओलचे नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडले गेले. बॉबी देओल एका अभिनेत्रीच्या प्रेमात पडला. दोघांना लग्न देखील करायचे होते. पण धर्मेंद्र यांच्यामुळे हे लग्न होऊ शकले नाही असं म्हटलं जातं.

बॉबी देओलचं या अभिनेत्रीसोबत होतं अफेअर, वडिलांमुळे मोडलं होतं लग्न
Follow us
| Updated on: Sep 04, 2024 | 9:05 PM

‘आश्रम’ नंतर स्टारडम मिळवणाऱ्या बॉबी देओलच्या करिअरमध्ये अनेक चढउतार आले. काही चित्रपट हिट ठरले पण बॉबी देओलला हवं तसं स्टारडम मिळत नव्हतं. बॉबीने स्वत: त्याच्या संघर्षाच्या दिवसांच्या कथा सांगितल्या आहेत. पण त्याच्या वैयक्तिक आयुष्यात देखील अनेक गोष्टी घडल्या ज्या खूप कमी लोकांना माहित आहेत. बॉबी देओलचा विवाह तान्या सोबत झालाय. पण तिच्याआधी तो एका अभिनेत्रीच्या प्रेमात पडला होता. अभिनेत्रीसोबत त्याचा साखरपुडा ही झाल्याचं बोललं जातं. अभिनेत्रीला त्याने प्रपोज केलं होतं.

बॉबी देओल हा एकेकाळी अभिनेत्री नीलम कोठारीला डेट करत होता. दोघेही पाच वर्षे रिलेशनशिपमध्ये होते, पण काही कारणांमुळे हे नाते तुटले. रिपोर्ट्सनुसार, बॉबी देओलचे वडील आणि अभिनेता धर्मेंद्र यांना हे नाते पसंत नव्हते. एका मुलाखतीत नीलमने बॉबी देओलसोबतच्या ब्रेकअपवर तिची वेदना शेअर केली होती.

नीलमने ‘स्टारडस्ट’ मासिकाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, तिला बॉबी देओलच्या करिअरबद्दल खात्री नव्हती. बॉबी देओल बॉलिवूडमध्ये करिअर करू शकेल की नाही याबाबत प्रश्नचिन्ह होता. बॉबी देओलसोबतच्या ब्रेकअपमध्ये तिच्या कुटुंबाची किंवा इतर कोणत्याही मुलीची भूमिका नव्हती. नीलम आणि बॉबी देओलचे नाते तेव्हा सुरू झाले जेव्हा ते अभिनेताही झाला नव्हता. पण नीलमने 1984 पासून चित्रपटांमध्ये काम करायला सुरुवात केली होती.

बॉबी देओलचे नाव नंतर पूजा भट्टसोबतही जोडले गेले. बॉबी देओल आणि पूजा भट्ट यांची एंगेजमेंट झाल्याचं देखील बोललं जातं. नीलम आणि बॉबी देओल यांचे ब्रेकअप पूजा भट्टमुळेच झाल्याचा दावा केला जात होता. मात्र, यावर बॉबी किंवा पूजाकडून कधीही कोणतीही प्रतिक्रिया या बाबत आली नाही. पण बॉबी देओलसोबत ब्रेकअप होण्यामागचं कारण पूजा भट्ट किंवा दुसरी कोणतीही मुलगी नसल्याचं नीलनं स्पष्ट केलं होतं.

IMDb च्या माहितीनुसार, बॉबी देओल आणि नीलमशी यांची एंगेजमेंट झाली होती. 1994 मध्ये बॉबीने अभिनेत्री ममता कुलकर्णीलाही प्रपोज केले होते. असे ही बोलले जाते.

आता लोकलमध्ये ज्येष्ठ नागरिकांचा प्रवास होणार आरामदायी, कारण ...
आता लोकलमध्ये ज्येष्ठ नागरिकांचा प्रवास होणार आरामदायी, कारण ....
मनसेच्या जय मालोकारचा मृत्यू नव्हे खून? पोस्टमार्टेम रिपोर्टनं खळबळ
मनसेच्या जय मालोकारचा मृत्यू नव्हे खून? पोस्टमार्टेम रिपोर्टनं खळबळ.
मंत्रिपदाच्या शपथविधीसाठी कोट तयार, आमदारान सांगितली निवडणुकीची तारीख
मंत्रिपदाच्या शपथविधीसाठी कोट तयार, आमदारान सांगितली निवडणुकीची तारीख.
जरांगेंची मागणी सरकार पूर्ण करणार? हैदराबाद गॅझेटवर मोठा निर्णय?
जरांगेंची मागणी सरकार पूर्ण करणार? हैदराबाद गॅझेटवर मोठा निर्णय?.
मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार
मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार.
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर.
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा.
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट.
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली.
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी.