व्हिडीओ : 'भारत'च्या प्रमोशनदरम्यान सलमानची बॉडीगार्डच्या कानशिलात

बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानचे लाखो चाहते आहे. त्याची एक झलक पाहण्यासाठी अनेक जण त्याच्या घराजवळ, शूटींगच्या ठिकाणी तात्कळत उभे असतात.

व्हिडीओ : 'भारत'च्या प्रमोशनदरम्यान सलमानची बॉडीगार्डच्या कानशिलात

मुंबई : बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानचे लाखो चाहते आहे. त्याची एक झलक पाहण्यासाठी अनेक जण त्याच्या घराजवळ, शूटींगच्या ठिकाणी तात्कळत उभे असतात. आज (5 जून) ईदच्या मूर्हतावर सलमानचा ‘भारत’ हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान एका सुरक्षा रक्षक लहान मुलीला धक्का देत असताना सलमानने चक्क त्याच्या कानशिलात बजावली.

बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानचा ‘भारत’ चित्रपट आज (5 जून) भारतासह जगभरात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून सलमानच्या चाहत्यांना उत्सुकता लागली होती.दरम्यान भारत चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान एक लहान मुलगी जवळच उभी होती. मात्र सलमानच्या चाहत्याची गर्दी वाढू लागल्याने सुरक्षा रक्षकाने चाहत्यांना धक्के मारुन बाहेर उभे राहण्यास सांगितले. त्यावेळी सुरक्षा रक्षकाच्या येथे उभ्या असलेल्या लहान मुलीलाही सुरक्षा रक्षकाने धक्काबुक्की केली. त्याचवेळी सलमानने हा सर्व प्रकार पाहिला. तो धावत सुरक्षा रक्षकाकडे आला आणि त्याने सुरक्षा रक्षकाच्या जोरात कानाखाली मारली. या सर्व प्रकार कुठे घडला याची अद्याप माहिती मिळू शकली नाही.

सलमान या चित्रपटात वेगवेगळ्या लुकमध्ये दिसणार आहे. भारत चित्रपटात पहिल्यांदाच दिशा पटाणी आणि सलमान एकत्र काम करणार आहेत. सुपरस्टार सलमान खानचा भारत चित्रपट 70 देशात 1300 पेक्षा अधिक स्क्रीन्सवर प्रदर्शित होत आहे. भारतात 4000 पेक्षा अधिक स्क्रीन आणि इतर देशात 1300 पेक्षा अधिक स्क्रीन्सवर चित्रपट प्रदर्शित झाला आहे.  हा चित्रपट पाहण्यासाठी अनेकांनी दोन दिवस आधीच तिकीट बुकींग केले आहे.

2014 साली रिलीज झालेल्या ‘ओड टू माय फादर’ या दक्षिण कोरियाई सिनेमाचा अधिकृत हिंदी व्हर्जन म्हणजे ‘भारत’ सिनेमा आहे. अतुल अग्निहोत्री यांच्या रील लाईफ प्रॉडक्शन आणि भूषण कुमार यांच्या टी सीरीजने एकत्रितपणे या सिनेमाची निर्मिती केली आहे. या चित्रपटात सलमान खान पहिल्यांदाच म्हाताऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळे सलमानच्या या नव्या लूकबद्दल चाहत्यांमध्येही उत्सुकता आहे. ‘भारत’ची कथा काय आणि त्यातील सलमानची नेमकी भूमिका कोणती, याबद्दल प्रेक्षकांना फार उत्सुकता लागली आहे.

व्हिडीओ :

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *