सर्वाधिक आयकर भरणाऱ्यांच्या यादीत बिग बी, एका वर्षाच्या टॅक्सची रक्कम तब्बल 70 कोटी

सर्वाधिक आयकर भरणाऱ्यांच्या यादीत बिग बी, एका वर्षाच्या टॅक्सची रक्कम तब्बल 70 कोटी

मुंबई: बॉलिवूडचे शहनशाह अशी ओळख असलेले अभिनेते अमिताभ बच्चन  यांनी 2018-19 या आर्थिक वर्षात 70 कोटी रुपये टॅक्स भरला आहे. यामुळे अमिताभ यांची 2018-19 आर्थिक वर्षातील सर्वाधिक करदात्यांपैकी एक ठरले आहेत. अमिताभ यांच्या प्रवक्त्यांनी याबाबतची माहिती दिली.

अमिताभ बच्चन यांच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 2018-19 या आर्थिक वर्षात अमिताभ यांनी तब्बल 70 कोटी रुपये टॅक्स आयकर विभागाकडे जमा केला आहे. त्याशिवाय त्यांनी काही रक्कम देणगी स्वरुपात दानही केली आहे. तसेच पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबासाठीही त्यांनी 10 लाख रुपये दिले आहेत. विशेष म्हणजे अमिताभ यांनी बिहारच्या मुजफ्फरपूर या गावातील 2084 शेतकऱ्यांचे कर्ज स्वत:च्या पैशाने चुकवले आहे.

गेल्यावर्षी केरळमध्ये पावसामुळे हाहा:कार माजला होता. तेथे राहणाऱ्या लोकांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले होते. अशा लोकांसाठी अमिताभ यांनी 51 लाख रुपयांची मदत दिली होती. अमिताभ यांनी केरळ पूरग्रस्तांसाठी  80 जॅकेट, 25 पॅंट, 20 शर्ट आणि काही स्कार्फही दिले होते.

अनेकदा राजकारणी, उद्योगपती, बिल्डर यांसारखे विविध लोक कर बुडवण्यासाठी विविध प्रकारच्या शक्कल लढवत असतात. पण अमिताभ यांनी  70 करोड रुपये आयकर जमा करत, त्यांच्या चाहत्यांसह सर्वांपुढे एक आदर्श ठेवला आहे. फक्त अमिताभ बच्चनच नाही तर सर्वाधिक आयकर भरणाऱ्यांच्या यादीत बॉलिवूडच्या अनेक कलाकारांचा समावेश आहे.

बॉलिवडूचे महानायक अमिताभ बच्चन यांनी आतापर्यंत अमर अकबर अँथोनी, परवरीश, मिस्टर नटवरलाल, शहेनशाह, अंधा कानून यांसारख्या विविध चित्रपटात काम केली आहेत. नुकतंच अभिनेत्री तापसी पन्नू हिच्यासोबत बदला या चित्रपटात त्यांनी भूमिका साकारली आहे. गेल्याच महिन्यात प्रदर्शित झालेल्या बदला चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 100 कोटी रुपयांचा गल्ला जमवला. सध्या अमिताभ ब्रह्मास्त्र या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. हा चित्रपट या वर्षाअखेरीस  डिसेंबर महिन्यात प्रदर्शित होणार आहे. यात अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूरही अमिताभ यांच्यासोबत दिसणार आहेत.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *