‘व्हॅलेंटाईन्स डे’ला उद्घाटन, धर्मेंद्र यांच्या रेस्टॉरंटला पालिकेकडून महिन्यात टाळं

धर्मेंद्र यांनी 'व्हॅलेन्टाईन्स डे'ला रेस्टॉरंट सुरु केलं होतं (Dharmendra restaurant sealed). मात्र, या रेस्टॉरंटला पालिकेकडून टाळं ठोकण्यात आलं आहे.

'व्हॅलेंटाईन्स डे'ला उद्घाटन, धर्मेंद्र यांच्या रेस्टॉरंटला पालिकेकडून महिन्यात टाळं

चंदिगड : ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र सध्या पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत (Dharmendra restaurant sealed). धर्मेंद्र यांनी ‘व्हॅलेन्टाईन्स डे’ला एक रेस्टॉरंट सुरु केलं होतं. या रेस्टॉरंटचं नाव ‘ही मॅन’ (He Man) असं होतं. मात्र, या रेस्टॉरंटला सुरु होऊन अवघा महिनाही पूर्ण होत नाही तेवढ्यात ते बंद पडलं आहे. कारण चंदिगड महापालिकेने या रेस्टॉरंटला टाळे ठोकले आहेत (Dharmendra restaurant sealed).

धर्मेंद्र यांचं हे रेस्टॉरंट अनधिकृतपणे बांधण्यात आल्याचा दावा महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात आला आहे. त्यामुळे महापालिकेचे अधिकारी रेस्टॉरंटमध्ये गेले आणि त्यांनी कारवाई केली. तिथे गेल्यावर त्यांनी सर्व ग्राहकांना आणि स्टाफला बाहेर काढलं आणि रेस्टॉरंटला टाळं ठोकलं.

हेही वाचा : कोरोनाचा बॉलिवूडला विळखा, आयफा सोहळा पुढे ढकलला, वरुण धवनचं विवाहस्थळ बदलणार?

याबाबत महापालिकेचे उपायुक्त निशांत कुमार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “आम्ही अनधिकृतपणे निर्माण करण्यात आलेल्या अनेक इमारतींना नोटीस दिली होती. मात्र, आम्हाला त्यावर काहीच प्रतिक्रिया मिळाली नाही. त्यामुळे पालिकेकडून ही कारवाई करण्यात आली”, असं उपायुक्त म्हणाले. दरम्यान, धर्मेंद्र यांच्याकडून याबाबत अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

धर्मेंद्र यांनी ट्विटरवर आपल्या नव्या रेस्टॉरंटची घोषणा केली होती. “प्रिय मित्रांनो, ‘गरम धरम धाबा’ला मिळालेल्या यशानंतर आम्ही ‘ही मॅन’ नावाचं रेस्टॉरंट सुरु करत आहोत. मी आपल्या प्रेमाचं आणि सन्मानाचा आदर करतो. आपल्या सगळ्यांचा आभारी आहे”, असं धर्मेंद्र ट्विटमध्ये म्हणाले होते.

धर्मेंद्र गेल्या कित्येक दिवसांपासून सिनेसृष्टीपासून लांब आहेत. ‘यमला पगला दिवाना’ या चित्रपटानंतर ते एकाही चित्रपटात दिसले नाहीत. धर्मेंद्र गेल्या काही दिवसांपासून आपल्या फार्म हाऊसमध्ये राहत असून शेती करत आहेत.

हेही वाचा : हिंदू-मुस्लिम एकतेवर रितेश देशमुखचा टिक टॉक व्हिडीओ

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI