सलमान खानच्या बहिणीचा मोठा निर्णय, अभिनेत्याने दिलेले सी फेसिंग अपार्टमेंट आता…
बॉलिवूड अभिनेता सलमान खान हे गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारे एक नाव आहे. सलमान खान याला जीवे मारण्याच्या धमक्या मिळताना दिसत आहेत. सतत जीवे मारण्याच्या धमक्या मिळत असतानाच सलमान खान याने बिग बॉस 18 चे शूटिंग पूर्ण केले आहे.
बॉलिवूड अभिनेता सलमान खान हा सध्या चांगलाच चर्चेत दिसतोय. सलमान खानला लॉरेंस बिश्नोईच्या टोळीकडून सतत जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत. बाबा सिद्दीकी यांची भर रस्त्यामध्ये गोळ्या झाडून हत्या लॉरेंस बिश्नोईच्या टोळीकडून करण्यात आलीये. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर सोशल मीडियावर एक पोस्ट देखील शेअर करण्यात आली. सलमान खानचे जवळचे लोक आपले दुश्मन असल्याचे त्या पोस्टमध्ये सांगण्यात आले. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर सलमान खानच्या सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतरही सलमान खानला जीवे मारण्याची धमकी मिळालीये. फक्त धमकीच नाही तर मोठी खंडणी देखील मागण्यात आलीये.
सतत जीवे मारण्याच्या धमक्या मिळत असतानाच सलमान खान याने बिग बॉस 18 चा विकेंडचा वार देखील होस्ट केलाय. सध्या फक्त सलमान खान हाच नाही तर त्याचे कुटुंबिय देखील चर्चेत आल्याचे बघायला मिळतंय. सलमान खान याची बहीण अर्पिता खान शर्मा ही नेहमीच चर्चेत असते. सलमान खान हा बहीण अर्पिता खान शर्माचे सर्व लाड पुरवतो.
सलमान खान याने बहीण अर्पिता हिला तिच्या लग्नात सी फेसिंग अपार्टमेंट गिफ्ट म्हणून दिले होते. आता सलमान खान याने दिलेले हे सी फेसिंग अपार्टमेंट अर्पिता शर्मा आणि तिचा पती आयुष यांनी विकले आहे. त्यांनी अपार्टमेंट 22 कोटीला विकल्याचे कळतंय. खार वेस्टमध्ये हे अपार्टमेंट होते जे आता अर्पिता हिने विकले आहे.
अर्पिता खान हिने हे अपार्टमेंट विकून ती वरळीमध्ये आपल्या कुटुंबासोबत शिफ्ट झालीये. 10 ऑक्टोबरमध्ये नवरात्रीदरम्यान त्यांनी हे फायनल केल्याचे देखील कळतंय. 2014 मध्ये सलमान खानने त्याची बहिण अर्पिता आणि आयुष यांना लग्नामध्ये सी फेसिंग अपार्टमेंट गिफ्ट केले होते. विशेष म्हणजे हे अपार्टमेंट सलमान खानच्या घरापासून गॅलेक्सी अपार्टमेंटपासून फक्त 5 मिनिटांच्या अंतरावर आहे.
सलमान खान यानेच अर्पिता खान हिचा पती आयुष याला बॉलिवूडमध्ये लॉन्च केले. ‘लवयात्री’ या चित्रपटात तो धमाका करताना दिसला. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर त्यांच्या अंत्यदर्शनाला अर्पिता खान ही अरबाज खान याच्यासोबत पोहोचली होती. सलमान खान याचे कायमच अर्पिता हिच्या लेकरांसोबतचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होताना दिसतात.