मला सलमानसोबत लग्न करायचंय : झरीन खान

वीर चित्रपटानंतर सलमान खान आणि जरीन खान यांचं अफेअर असल्याच्या चर्चा बॉलिवूडमध्ये रंगल्या होत्या. ते एकमेकांना डेट करत असल्याचेही बोललं जात होतं.

मला सलमानसोबत लग्न करायचंय : झरीन खान

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सलमान खानने सिनेसृष्टीत अनेक अभिनेत्रींना लाँच केले आहे. त्यातील एक म्हणजे अभिनेत्री झरीन खान…झरीनने सलमानसोबत ‘वीर’ चित्रपटातून बॉलिवूमध्ये पदापर्ण केले. यानंतर ती ‘रेडी’ चित्रपटातील ‘कॅरेक्टर ढीला है’ या गाण्यातही सलमानसोबत झळकली होती. याशिवाय तिने अनेक चित्रपटात काम केलं असलं, तरी तिला त्यात म्हणावं तसं यश मिळालेले नाही. नुकतंच झरीनने एका मुलाखतीत सलमानशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. बॉम्बे टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत तिने हे वक्तव्य केले.

झरीनला बॉम्बे टाईम्सच्या मुलाखतीत अनेक विनोदी प्रश्न विचारण्यात आले. त्यातील एक म्हणजे “तुला स्वत:बद्दल कोणतीही अफवा पसरवण्यास आवडेल? अशी विचारणा करण्यात आली. त्यावर उत्तर देताना झरीन म्हणाली की, सलमान खान माझ्याशी लग्न करणार असल्याची अफवा पसरवण्यास मला आवडेल.”

याशिवाय या मुलाखतीत “तिला तू सलमान खान, गौतम रोडे आणि करण सिंह ग्रोवर यातील कोणाशी लग्न किंवा डेटवर जाण्यास तू इच्छुक आहे? असेही विचारण्यात आले. त्यावर उत्तर देतानाही झरीनने सलमानचे नाव घेतले. मी सलमानसोबत डेटवर जाण्यास इच्छुक असल्याचे तिने सांगितले.”

वीर चित्रपटानंतर सलमान खान आणि जरीन खान यांचं अफेअर असल्याच्या चर्चा बॉलिवूडमध्ये रंगल्या होत्या. ते एकमेकांना डेट करत असल्याचेही बोललं जात होतं. झरीनसह सलमानचेही विविध अभिनेत्रींसोबत नाव जोडलं गेलं आहे. सलमानचे चाहते त्याच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र सलमान लग्नासाठी अद्याप तयार नसल्याचे बोललं जातं आहे.

 

View this post on Instagram

 

? #NoirEtBlanc #Mood #HappySunday #ZareenKhan

A post shared by Zareen Khan ??✨?? (@zareenkhan) on

दरम्यान झरीन खान सध्या ‘डाका’ या पंजाबी चित्रपटाच्या शूटींगमध्ये व्यस्त आहे. झरीन 2018 मध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘1921’ या चित्रपटात झळकली होती. तर दुसरीकडे सलमानही ‘दबंग 3’ या चित्रपटाच्या शूटींगमध्ये बिझी आहे. त्यासोबतच दिग्दर्शक संजय लीला भंसाळी यांच्या ‘इंशाअल्लाह’ या चित्रपटातही सलमान झळकणार आहे. यात सलमानसोबत आलिया भट्ट दिसणार आहे. या चित्रपटासाठी सलमानने त्याचे वजनही कमी केले आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *