'त्या' गोंडस सेल्फीवर बॉलिवूडही फिदा

मुंबई : एका अज्ञात फोटोग्राफरने आपल्या कॅमेऱ्यात कैद केलेला एक गोंडस फोटो सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होतो आहे. या फोटोमध्ये काही लहान मुलं सेल्फी घेण्यासाठी पोज देऊन उभे आहेत. पण त्यांच्या हातात फोन नाही तर चप्पल आहे. या फोटोमधील विशेष बाब जी सर्वांना आकर्षित करत आहे, ती म्हणजे या मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद. हा फोटो …

'त्या' गोंडस सेल्फीवर बॉलिवूडही फिदा

मुंबई : एका अज्ञात फोटोग्राफरने आपल्या कॅमेऱ्यात कैद केलेला एक गोंडस फोटो सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होतो आहे. या फोटोमध्ये काही लहान मुलं सेल्फी घेण्यासाठी पोज देऊन उभे आहेत. पण त्यांच्या हातात फोन नाही तर चप्पल आहे. या फोटोमधील विशेष बाब जी सर्वांना आकर्षित करत आहे, ती म्हणजे या मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद. हा फोटो इतका व्हायरल झाला की, बॉलिवूडच्या बड्या कलाकारांनी हा फोटो शेअर केला. हा पाच मुलांचा फोटो अभिनेता अनुपम खेर, बोमन इरानी आणि सुनिल शेट्टीने सोशल मीडियावर शेअर केला.

पहिल्यांदा या फोटोला अभिनेता अनुपम खेर यांनी शेअर केलं. त्यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर या फोटोला  शेअर करत लिहिले की, “कुठलीही गोष्ट त्यांच्यासाठी सर्वोत्तम असते, ज्यांना ती सर्वोत्तम कशी बनवायची हे माहित असते.”


अभिनेता बोमन इरानी यांनीही हा फोटो शेअर केला आहे. त्यांनी लिहिले की, “आपण तेव्हढंच आनंदी होतो, जेव्हढं आपल्याला व्हायचं असतं, ही एक अशी म्हण आहे जी सर्वांवर लागू होते. मी दावा करतो की, हा सेल्फी इतर कुठल्याही सेल्फीपेक्षा जास्त लाईक्स डिजर्व्ह करते.”

अभिनेता सुनिल शेट्टीनेही हा फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत लिहिले की, “हा सुंदर फोटो तर मला शेअर करावाच लागेल, हॅपीनेस ट्रूली अ स्टेट ऑफ माईंड!!!”

 

View this post on Instagram

 

Came across this beauuuuuutiful picture which I had to share . “HAPPINESS “ truly a state of mind !!!

A post shared by Suniel Shetty (@suniel.shetty) on

महानायाक अमिताभ बच्चन यांनी हा फोटो शेअर केला नाही. मात्र, याबाबतचे आपले विचार सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त केले. अमिताभ बच्चन यांनी ट्विटरवर काही फोटो शेअर केले आणि लिहिले की, “सामान्य व्यक्ती आता सामान्य राहिलेली नाही, ती खास बनली आहे. ती स्वत:चा प्रचार करु शकते, त्याचं माध्यमही ती स्वत:च आहे. सामान्य व्यक्ती आता स्वत:कडे लक्ष आकर्षित कसे करुन घ्यायचे हे शिकली आहे. लक्ष आकर्षित करणे व्यक्तीचे चलन, पैसे, मूल्य बनले आहे. त्यांचे शस्त्र- मोबाईल! तुम्ही किती मोबाईल मोजू शकता?”

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *