विकी कौशलपासून ते अभिषेक बच्चनपर्यंत, हे अभिनेते देखील त्यांच्या पत्नीसाठी ठेवतात करवा चौथचे व्रत
करवा चौथला पती-पत्नीच्या प्रेमाचे प्रतीक मानले जाते. सामान्यांपासून अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी देखील हा सण साजरा करतात. तर अनेक अभिनेते चक्क त्यांच्या पत्नीसाठी देखील हे व्रत करतात. त्यांच्या पत्नीसाठी करवा चौथचा उपवासही करतात. कोण आहेत ते सेलिब्रिटी पाहुयात.

10 ऑक्टोबर रोजी करवा चौथ आहेत. विवाहित महिला त्यांच्या पतींच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखासाठी, निरोगी आयुष्यासाठी करवा चौथचे व्रत पाळतात. करवा चौथ हा सण पती-पत्नीमधील प्रेमाचे प्रतीक आहे. विवाहित महिला या दिवशी उपवास करतात. अनेक अभिनेत्री देखील हा सण साजरा करतात. आता, एक नवीन ट्रेंड आला आहे तो म्हणजे काही पुरुषांनीही त्यांच्या पत्नींसोबत हा उपवास पाळण्यास सुरुवात केली आहे. बॉलिवूडमध्ये देखील याची बरीच उदाहरणे आहेत. अनेक अभिनेते त्यांच्या पत्नींसोबत उपवास करून हा सण साजरा करतात.
हे बॉलिवूड अभिनेते त्यांच्या पत्नीसह करवा चौथचे व्रत ठेवतात
अभिषेक बच्चन
ऐश्वर्या राय बच्चन करवा चौथ मोठ्या उत्साहात साजरा करते. दरवर्षी, ती अभिषेक बच्चनसाठी हे व्रत करते. अभिषेक बच्चन देखील त्याच्या सुंदर पत्नीसाठी हे व्रत पाळतो, दिवसभर तोही उपवास करतो. चंद्र पाहिल्यानंतर संध्याकाळी ते एकत्र उपवास सोडतात.
राज कुंद्रा
शिल्पा शेट्टी दरवर्षी करवा चौथ साजरा करते. दरवर्षी तिचा करवा चौथचा लूक सोशल मीडियावर व्हायरल होतो. विशेष म्हणजे, तिचा पती राज कुंद्रा देखील तिच्यासोबत उपवास करतो. राज कुंद्रा देखील शिल्पा शेट्टीसाठी हे व्रत पाळतो.
विकी कौशल
अभिनेता विकी कौशल आणि कतरिना कैफ ही चाहत्यांची आवडती जोडी आहे. ते अगदी परिपूर्ण कपल गोल आहेत. लवकरच ते त्यांच्या पहिल्या बाळाचे स्वागत करतील. कतरिना कैफ परदेशात वाढली असली तरी तिने भारतीय संस्कृती चांगल्या प्रकारे स्वीकारली आहे. विकी कौशलशी लग्न केल्यापासून तिने करवा चौथचे व्रत पाळले आहे. विकी देखील कतरिनासोबत करवा चौथचे व्रत पाळतो.
आयुष्मान खुराना
आयुष्मान खुराना आणि ताहिरा कश्यप ही जोडी देखील कायम त्यांच्या कपल गोल साठी चर्चेत असते. ते चाहत्यांचे आवडते आहेत. वृत्तानुसार, ताहिरा कश्यप एकदा वैद्यकीय कारणांमुळे करवा चौथचे व्रत पाळू शकली नव्हती पण आयुष्मान खुरानाने तिच्यासाठी हे व्रत पाळले होते. तिच्या निरोगी आयुष्यासाठी हे व्रत पाळले होते.
जय भानुशाली
या यादीत अभिनेता जय भानुशालीचाही समावेश आहे. तो त्याची पत्नी माही विजसाठी करवा चौथचा उपवास करतो. दोघेही एकत्र हा सण साजरा करतात.
