Kangana Ranaut | सोशल मीडिया अकाऊंट हॅक, कंगना राणावतला बलात्काराची धमकी

ओडिशाच्या मेहंदी रझा या वकिलाच्या ट्विटर अकाऊंटवरून कंगनाला बलात्काराची धमकी देणारी कमेंट करण्यात आली होती.

Kangana Ranaut | सोशल मीडिया अकाऊंट हॅक, कंगना राणावतला बलात्काराची धमकी
Follow us
| Updated on: Oct 20, 2020 | 2:38 PM

मुंबई : बॉलिवूडची ‘पंगा क्वीन’ अभिनेत्री कंगना राणावत (Kangana Ranaut) नेहमीच कुठल्याना कुठल्या कारणाने चर्चेत असते. सध्या सुरू असेलेला सोशल मीडियावरचा वाद कंगनाबद्दलचा रोष वाढवणारा ठरला आहे. अलीकडेच कंगनाला तिच्या सोशल मीडिया पोस्टवर कमेंट करत बलात्काराची धमकी (Rape Threat) देण्यात आली आहे. ओडिशाच्या एका वकिलाच्या अकाऊंटवरून ही धमकी देण्यात आली आहे. यानंतर त्याच्या या कमेंटवर नेटकरी अक्षरशः तुटून पडले, हे प्रकरण लक्षात आल्यावर त्या वकिलाने दिलगिरी व्यक्त करत, आपले अकाऊंट हॅक झाल्याचा दावा केला आहे. (Bollywood actress Kangana Ranaut gets Rape Threat on social media)

नवरात्रीची सुरुवात होताच कंगनाने तिचे काही फोटो शेअर करत सर्वांना नवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या होत्या. या पोस्टवर ओडिशाच्या मेहंदी रझा या वकिलाच्या ट्विटर अकाऊंटवरून कंगनाला बलात्काराची धमकी देणारी कमेंट करण्यात आली होती. मेहंदी रझा या कमेंटवर खूप टीका झाली. लोकांनी त्याला चांगलेच खडे बोल सुनावले. ही प्रकरण चिघळत असल्याचे पाहून मेहंदी राजाने माफी मागत एक पोस्ट लिहून आपले अकाऊंट हॅक झाल्याचा दावा केला आहे.

पोस्ट करत वकिलाने मागितली माफी

ओडिशास्थित वकील मेहंदी रझाने घडल्या प्रकारानंतर माही मागणारी पोस्ट लिहिली आहे. ‘आज संध्याकाळी माझे सोशल मीडिया अकाऊंट हॅक करण्यात आले होते. त्यावरून अशा वाईट, घाणेरड्या कमेंट केल्या गेल्या. कुठल्याही महिलेबाबत मी असे वाईट विचार करत नाही. मी स्वतः या प्रकाराने हैराण असून, सर्वांची माफी मागतो आहे. सर्वांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत, तरी सर्वांनी मला माफ करावे’, असे त्याने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे.(Bollywood actress Kangana Ranaut gets Rape Threat on social media)

ट्विट करत कंगनाची महाराष्ट्र सरकारवर टीका

कंगनाने नवरात्रीचे फोटो शेअर करत पुन्हा एकदा शिवसेनेवर टीका केली आहे. ‘नवरात्रीचे व्रत कोण कोण ठेवत आहे? माझादेखील आज उपास आहे. माझ्याविरोधात पुन्हा एकदा एफआयआर दाखल करण्यात आला आहे, असे दिसते आहे की महाराष्ट्रात असलेल्या पप्पू सैन्याला मी फार आवडले आहे. माझी इतकी आठवण काढू नका, मी लवकरच परत येते आहे’, अशा आशयाचे ट्विट करत कंगनाने महाराष्ट्र सरकारवर निशाणा साधला आहे.

कंगना राणावतसह रंगोली चंडेलविरोधातही गुन्हा दाखल

कंगनासह तिची बहीण रंगोली रनौतच्या विरोधातही वांद्रे पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. त्यामुळे कंगनाच्या अडचणीत वाढ होणार आहे. कंगनाने (Kangana Ranaut) मुंबई बद्दल केलेले वादग्रस्त ट्वीट, दोन धर्मात तेढ निर्माण होणारे वक्तव्य, हिंदू आणि मुस्लिम यांच्यात तेढ निर्माण करणारे वक्तव्य केले होते.  या वक्तव्याविरोधात याचिका दाखल करण्यात आली होती

साहिल सय्यदने प्रथम मुंबई पोलिसात अर्ज दाखल केला होता. मात्र पोलिसांनी अर्जाची दखल न घेतल्याने त्याने कोर्टात धाव घेतली होती. कंगना आणि तिच्या बहिणी विरोधात 1523 A, 295 A, IPC 124 A या कलमातंर्गत गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

(Bollywood actress Kangana Ranaut gets Rape Threat on social media)

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.