बॉलीवूड अभिनेत्रींचं न्यू इयर सेलिब्रेशन

मुंबई : 2018 या वर्षाचा आजचा शेवटचा दिवस, त्यामुळे प्रत्येकजण आपआपल्या परिने नवीन वर्षाचे स्वागत करत आहे, त्यातचं बॉलीवूडच्या काही अभिनेत्रीही आपल्या खास अंदाजात नवीन वर्ष सेलिब्रेट करताना दिसत आहेत. नवीन वर्ष सेलिब्रेट करण्यासाठी बॉलीवूड स्टार्स हे विदेशी ठिकाणांना जास्त पसंती देतात. त्यामुळे वर्षाच्या अखेरीस बॉलीवूडची अनेक मंडळी विदेशात फिरायला जातात. यावर्षी कोण कुठे आणि …

बॉलीवूड अभिनेत्रींचं न्यू इयर सेलिब्रेशन

मुंबई : 2018 या वर्षाचा आजचा शेवटचा दिवस, त्यामुळे प्रत्येकजण आपआपल्या परिने नवीन वर्षाचे स्वागत करत आहे, त्यातचं बॉलीवूडच्या काही अभिनेत्रीही आपल्या खास अंदाजात नवीन वर्ष सेलिब्रेट करताना दिसत आहेत. नवीन वर्ष सेलिब्रेट करण्यासाठी बॉलीवूड स्टार्स हे विदेशी ठिकाणांना जास्त पसंती देतात. त्यामुळे वर्षाच्या अखेरीस बॉलीवूडची अनेक मंडळी विदेशात फिरायला जातात. यावर्षी कोण कुठे आणि कशाप्रकारे न्यू इयर सेलिब्रेट करत आहेत बघुया…

प्रियांका चोप्रा :

 

देसी गर्ल प्रियांका चोप्रा ही 2 डिसेंबरला निक जोनाससोबत लग्न बेडीत अडकली. त्यामुळे प्रियांकाचा हा न्यू इयर खास आहे. ती सध्या स्वित्झर्लंडमध्ये आपल्या पतीसोबत म्हणजेच निक जोनाससोबत नवीन वर्ष सेलिब्रेट करत आहे.

दीपिका पादुकोण  :

 

अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि अभिनेता रणवीर सिंह हे दोघेही नुकतेच विवाहबंधनात अडकले आहेत. त्यामुळे सध्या ते न्यू यॉर्कमध्ये आपलं हनीनमून आणि नवीन वर्ष सेलिब्रेट करत आहेत.

दिशा पाटणी :

 

आपल्या हॉट आणि बोल्ड फोटोंमुळे इंटरनेट सेंन्सेशन बनलेल्या दिशा पाटणीने न्यू इयर सेलिब्रेट करतानाचे आपले काही दिलखेच फोटोज सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

आलिया भट्ट :

 

आलिया भट्ट ही सध्या न्यू यॉर्कमध्ये बॉयफ्रेंड रणबीर कपूर सोबत न्यू इयर सेलिब्रेट करत आहे.

अनुष्का शर्मा :

 

अभिनेत्री अनुष्का शर्मा सध्या पती विराट कोहलीसोबत सिडनीमध्ये नवीन वर्ष सेलिब्रेट करत आहे.

करिना कपूर :

 

करिना कपूर ही सहकुटुंबासह म्हणजेच पती सैफ अली खान आणि मुलगा तैमुरसोबत स्वित्झर्लंडमध्ये नवीन वर्षाचं स्वागत करणार आहे. ती तैमुरच्या वाढदिवसानिमीत्त स्वित्झर्लंडमध्ये गेली होती.

किआरा आडवाणी :

 

अभिनत्री किआरा आडवाणी हिने आपले काही बोल्ड फोटोज सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

 

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *