सोनाक्षी सिन्हा हिचा जहीर इक्बालसोबतच्या लग्नानंतर हैराण करणारा खुलासा, थेट म्हणाली, माझ्या आई वडिलांना पण…
बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा सध्या तिच्या चित्रपटांसोबतच खासगी आयुष्यामुळेही जोरदार चर्चेत आहे. सोनाक्षी हिने जहीर इक्बालसोबत लग्न करत सर्वांनाच मोठा धक्का दिला. आता सोनाक्षीने लग्नानंतर पहिल्यांदाच मोठा खुलासा केला आहे.

बॉलिवूड अभिनेत्री आणि शत्रूघ्न सिन्हा यांची लेक सोनाक्षी सिन्हा हिने बॉलिवूड चित्रपटांमध्ये धमाका केला. आजही लोकांना सोनाक्षी हिचा दबंग चित्रपटातील अभिनय आठवतो. सोनाक्षीने तिच्या आतापर्यंतच्या बॉलिवूड करिअरमध्ये अनेक हीट चित्रपट केली आहेत. विशेष म्हणजे तिच्या आगामी चित्रपटाचीही जोरदार चर्चा रंगताना दिसतंय. पहिल्यांदाच सोनाक्षी काहीतरी वेगळ्या भूमिकेत दिसत आहे. 23 जून 2024 रोजी सोनाक्षी हिने जहीर इक्बाल याच्यासोबत सिव्हिल मॅरेज केली. झहीर याच्यासोबतच्या लग्नानंतर सोनाक्षीने इस्लाम धर्म स्वीकारल्याची जोरदार चर्चा सुरू होती. हेच नाही तर अनेकजण सोनाक्षीला खडेबोल सुनावतानाही दिसले. सोनाक्षीचे दोन्ही भाऊ या लग्नापासून दूर होते. सिव्हिल मॅरेजच्या वेळी सही करताना सोनाक्षीचे आई आणि वडील तिच्यासोबत खंबीरपणे उभे दिसले.
विशेष म्हणजे लग्नानंतर सतत विदेशात फिरताना सोनाक्षी सिन्हा दिसली. सोनाक्षी आणि जहीर यांनी तब्बल सात वर्षांपेक्षाही अधिक काळ एकमेकांना डेट केले आणि त्यानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला. सलमान खान याच्या पार्टीमध्ये सोनाक्षी आणि जहीर यांची पहिली भेट झाली. विशेष म्हणजे पहिल्याच भेटीत दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. सोनाक्षीने काही वर्ष दोघांच्या अफेअरचा गोष्ट सर्वांपासून लपून ठेवली होती.
नुकताच सोनाक्षी सिन्हा सोहा अली खानच्या पॉडकास्टमध्ये पोहोचली होती. यावेळी तिने जहीरसोबतचे रिलेशन सर्वांपासून लपून ठेवण्याचे कारण सांगितले. मी एक कलाकार असल्याने मला वाटत होते की, लोकांनी माझ्या खासगी आयुष्यापेक्षा माझ्या कामावर लक्ष द्यावे. सोनाक्षी सिन्हा हिने पहिल्यांदाच मोठा खुलासा करत म्हटले की, मी जवळपास तीन वर्ष जहीर इक्बालसोबतच्या नात्याबद्दल माझ्या पालकांना सांगितले नव्हते.
मी स्वत: मनाने तयार होत नाही, तोपर्यंत मला माझे नाते खासगीच ठेवायचे होते. जहीरसोबतच्या लग्नानंतर तिने हा मोठा खुलासा केला. सोहाने तिला सोशल मीडियावरील नकारात्मक कमेंट्सबद्दल विचारले त्यावेळी सोनाक्षी म्हणाली की, त्यावेळी सर्वकाही मुर्खपणासारखे वाटत होते. आम्ही आमच्या आयुष्याची नवीन सुरूवात केली होती. आम्ही पुढचे आयुष्य एकत्र घालवायची होती, खूप जास्त आनंदी होतो. त्यामुळे त्या गोंधळाकडे दुर्लक्ष करण्यासाठी मी माझा कमेंट बॉक्स बंद केला.
