‘मकडी’फेम बॉलिवूड अभिनेत्री श्वेता प्रसादचा घटस्फोट

लग्नाच्या पहिल्या अॅनिव्हर्सरीआधीच अभिनेत्री श्वेता बसू प्रसाद आणि पती रोहित मित्तल यांनी परस्पर सहमतीने काडीमोड घेण्याचा निर्णय घेतला.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 7:45 AM, 11 Dec 2019

मुंबई : ‘मकडी’ चित्रपटातील दुहेरी भूमिकेमुळे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेली प्रसिद्ध बॉलिवूड आणि दाक्षिणात्य अभिनेत्री श्वेसा बासू प्रसाद पतीपासून विभक्त होत आहे. लग्नानंतर अवघ्या वर्षभराच्या आतच श्वेताने घटस्फोट (Shweta Basu Prasad Divorce) घेत असल्याची घोषणा सोशल मीडियावरुन केली.

श्वेताने गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात बॉयफ्रेण्ड रोहित मित्तलसोबत लग्नगाठ बांधली होती. मात्र पहिल्या अॅनिव्हर्सरीआधीच दोघांनीही परस्पर सहमतीने काडीमोड घेण्याचा निर्णय घेतला. बरेच दिवस विचार केल्यानंतर दोघं या निर्णयापर्यंत आले.

‘रोहित मित्तल आणि मी परस्पर सामंजस्याने आपापले मार्ग वेगळे करण्याचा आणि विवाहबंधन तोडण्याचा निर्णय घेतला आहे. अनेक दिवस विचार-विनिमय केल्यानंतर, आम्ही एकमेकांच्या हितासाठी काही महिन्यांपूर्वी या निर्णयापर्यंत पोहचलो. प्रत्येक पुस्तक मुखपृष्ठापासून शेवटच्या पानापर्यंत वाचायचं नसतं, याचा अर्थ ते पुस्तक वाईट आहे, असा होत नाही किंवा एखादा वाचू शकत नाही, असंही नाही. काही गोष्टींची मजा अपूर्णत्वातच असते. मला अविस्मरणीय आठवणी आणि नेहमीच  प्रेरणा दिल्याबद्दल रोहितचे आभार. उज्ज्वल आयुष्य जग, मी नेहमीच तुला प्रोत्साहन देत राहीन’ अशी पोस्ट श्वेताने केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shweta Basu Prasad (@shwetabasuprasad11) on


श्वेता विवेक अग्निहोत्रीच्या ‘द ताश्कंद फाइल्स’ या चित्रपटात नुकतीच दिसली होती. 2002 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मकडी’ चित्रपटातून तिने बाल कलाकार म्हणून सिने इंडस्ट्रीत प्रवेश केला. शबाना आझमी यांची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटात तिने ‘चुन्नी-मुन्नी’ची दुहेरी व्यक्तिरेखा साकारली होती. त्यानंतर ती ‘कहानी घर घर की’ आणि ‘करिश्मा का करिश्मा’ या टीव्ही शोमध्ये दिसली. याशिवाय श्रेयस तळपदेसोबत ‘इक्बाल’ चित्रपटातही तिने भूमिका साकारली होती.

काही वर्षांपूर्वी चंद्रनंदिनी टीव्ही शो आणि गँगस्टर वेब सीरिजमध्ये देखील झळकली. ‘बद्रिनाथ की दुल्हनिया’ आणि ‘मर्द को दर्द नहीं होता’ या सिनेमातही तिने भूमिका केल्या आहेत. ती ‘शुक्राणू’ चित्रपटात अभिनेता दिव्येंद्रू शर्मा आणि शीतल ठाकूरसोबत झळकणार (Shweta Basu Prasad Divorce) आहे.