वडिलांनी जीव देताच मलायकाच्या मदतीला सर्वात आधी पूर्वीचा नवरा धावला; अर्जुन कपूर नेमका कुठे होता?, धावपळ आणि…
मलायका अरोरा हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. मलायकाची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. मलायका सोशल मीडियावर सक्रिय असते. मलायकाच्या वडिलांनी बाल्कनीतून उडी घेत थेट आत्महत्या केल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसल्याचे बघायला मिळाले. आता अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहेत.
मलायका अरोरा हिच्यासाठी 11 सप्टेंबर 2024 हा दिवस वाईट ठरला. सकाळी नऊ वाजता मलायका अरोरा हिच्या वडिलांनी बाल्कनीतून उडी घेत थेट आत्महत्या केली. ज्यावेळी मलायका अरोराच्या वडिलांनी आत्महत्या केली, त्यावेळी मलायका ही पुण्यात होती. वडिलांच्या आत्महत्येची माहिती मिळताच मलायका बांद्रामध्ये पोहोचली. वडिलांच्या आत्महत्येनंतर मलायका आणि तिच्या बहिणीला मोठा धक्का बसला. मलायकाच्या वडिलांनी आत्महत्या नेमकी का केली? याबद्दल खुलासा हा होऊ शकला नाही. पोलिस या प्रकरणात तपास करत आहेत. काही वेळापूर्वीच मलायकाच्या वडिलांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
मलायका अरोराच्या वडिलांच्या आत्महत्येबद्दल कळताच अरबाज खान हा काही मिनिटांमध्येच धावून आला. हेच नाही तर यावेळी अरबाज खानचे वडील सलीम खान आणि आई सलमा खान हे देखील पोहोचले. मलायका अरोरा तिथे नसताना सर्व गोष्टी सांभाळून घेताना अरबाज खान हा दिसला. मलायका अरोरा हिच्या वाईट काळात तिच्यासोबत उभा एक्स पती अरबाज खान होता.
अरबाज खान हा मलायका अरोराच्या कुटुंबाच्या मदतीला धावून आला. मात्र, यावेळी सुरूवातील अर्जुन कपूर हा दिसला नाही. ज्यावेळी अरबाज खान हा धावपळ करत होता, त्यावेळी अर्जुन कपूर तिथे पोहोचला देखील नव्हता. मलायका अरोरा ही ज्यावेळी तिच्या आई वडिलांच्या घरी पोहोचली, त्यानंतर अर्जुन कपूर हा तिथे पोहोचला.
अरबाज खान याचे धावपळ करतानाचे फोटो आणि व्हिडीओ पाहून अनेकांनी म्हटले की, काहीही झाले तरीही पती हा कायमच पती असतो मग तो एक्स का असेना…मलायका हिच्या वाईट काळात अरबाज खान धावून आला. अनेकांनी अरबाज खान याचे काैतुक देखील केले. काही वर्षांपूर्वीच अरबाज खान आणि मलायका यांचा घटस्फोट झाला.
अरबाज खान याच्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर मलायका अरोरा ही अर्जुन कपूरला डेट करत आहे. मात्र, काही दिवसांपासून चर्चा आहे की, मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांचे ब्रेकअप झाले. मात्र, दोघांनीही त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चांवर भाष्य केले नाहीये. वडिलांच्या आत्महत्येचा धक्का मलायका हिला इतका जास्त लागला आहे की, कॅमेऱ्यासमोरच डोळे पुसताना दिसली.